मोठी गुड न्यूज; सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

Gold-Silver Rate Today | सोनं खरेदी करायला कुणाला आवडत नाही. किंवा सोन्याची दागिने न आवडणारे कमीच लोक आढळतात. मात्र सोने खरेदी करताना आपल्या बजेटकडेही बघावं लागतं. त्यातच भाव कधी जास्त तर कधी कमी होत असतात. मात्र आज तुमच्यासाठी खुशखबरच आहे. कारण आज (6 फेब्रुवारी) सोने-चांदीचे (Gold-Silver Rate Today) भाव उतरले आहेत.

दोन दिवसांनी प्रेमाचा आठवडा सुरू होणार आहे. म्हणजेच व्हॅलेंटाईन आठवडा सुरू होणार आहे. या दिवसात आपल्या प्रिय व्यक्तींना आपण खास गिफ्ट देत असतो. या आठवड्यात लग्नाची मागणीही घातली जाते. यासाठी सुंदर अंगठी किंवा दागिने खरेदी करण्यावर जोर असतो. तुम्हालाही जर आपल्या प्रिय व्यक्तींसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे.

जाणून घ्या आजचे दर

जानेवारी महिन्यात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली होती. सोने (Gold-Silver Rate Today) तब्बल 2200 रुपयांनी तर चांदीत 4400 रुपयांची घसरण झाली होती. तर, या महिन्याच्या सुरुवातीला त्यात पुन्हा वाढ झाली. 1 फेब्रुवारी रोजी सोने 170 रुपयांनी तर 2 फेब्रुवारीला 160 रुपयांनी भाव वधारले. तर 3 फेब्रुवारी रोजी किंमतीत 220 रुपयांची घसरण झाली. मात्र, या दोन दिवसात याचे भाव पुन्हा उतरले आहेत.

5 फेब्रुवारी रोजी 150 रुपयांनी भाव उतरले आहेत. त्यानुसार 22 कॅरेट सोने 58,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,370 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर, चांदीचा भाव 75,200 रुपये आहे. त्यामुळे तुम्ही आज सोने खरेदी करू शकता.

‘असा’ असेल कॅरेटचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) नुसार सोने-चांदीचे (Gold-Silver Rate Today) आजचे भाव ठरवले आहेत. त्यानुसार 24 कॅरेट सोने 62,512 रुपये, 23 कॅरेट 62,262 रुपये, 22 कॅरेट सोने 57,261 रुपये झाले. 18 कॅरेट 46,884 रुपये, 14 कॅरेट सोने 36,569 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहेत.

त्यामुळे तुम्ही या व्हॅलेंटाईन वीकमध्ये आपल्या आवडीचे दागिने खरेदी करुन आपल्या प्रिय व्यक्तीला खुश करू शकता. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर, तुम्ही घरबसल्याही ती जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व माहिती प्राप्त होईल.

News Title- Gold-Silver Rate Today

महत्त्वाच्या बातम्या –

“मला मारून टाका, फासावर लटकवा पण..”, Poonam Pandey ची पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट

घटस्फोटानंतर किरण सोबतच्या नात्याबाबत आमिर खानचा मोठा खुलासा, म्हणाला..

रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढलं?, मोठा खुलासा आला समोर

IND vs ENG: गांगुलीच्या वक्तव्यामुळे गदारोळ; द्रविडची तिखट प्रतिक्रिया, भारताचा विजय पण…

“आम्हाला संपूर्ण जगाशी मैत्री हवी आहे पण…”, Amit Shah यांचा दहशतवाद्यांना इशारा