शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी; ‘या’ शेतीसाठी सरकार देतंय अनुदान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Government Scheme | केंद्र सरकार आणि राज्य सरकार आता शेतीसाठी देखील आर्थिक योजना (Government Scheme) देत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय. अनेकदा शेतकऱ्यांना आपल्या शेतीत मिळणाऱ्या एकूण खर्चातून अनपेक्षित मोबदला मिळतो. मात्र आता राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राजस्थानमधील 17 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लाभ घेता येणार असून खजूराची शेती करता येणार आहे. यासाठी 75 टक्के अनुदान मिळणार आहे.

खजूराच्या शेतीला अनुदान मिळणार

गेल्या काही दिवसांपासून खजूराच्या शेतीची सर्वाधिक चर्चा आहे. आता केंद्र सरकार या शेतीसाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (Government Scheme) तब्बल 75 टक्के अनुदान देणार आहे. यामुळे आता राजस्थानातील शेतकऱ्यांची चंगळ आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ही योजना बारमेर, चुरू, सिरोही, जैसलमेर, श्रीगंगानगर, जोधपूर, हनुमानगढ, नौगर, पाली, जालोर, बिकानेर, झुंझुनू इत्यादी जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे.

ठिबक सिंचन बंधनकारक 

राजस्थान सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 75 टक्के अनुदान दिलं आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणून शेती क्षेत्रामध्ये विकसितपणा यावा यासाठी शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर तंत्राचा वापर करत शेती केली जावी. याप्रकरामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करणं बंधनकारक असल्याचं सांगितलं आहे. तसेच टिश्यू कल्चर प्रकारामध्ये एका रोपासाठी 3000 रूपये मोजावे लागतील.

प्रति हेक्टरी पाच लाखांचं उत्पादन 

या योजनेच्या माध्यमातून शेतकरी तब्बल पाच लाखांचं उत्पादन घेऊ शकतात. यासाठी अनुदान जरी भेटलं असलं तरीही 3.8 लाख रूपये प्रति हेक्टर खर्च येतो. पेरणीच्या तिसऱ्या वर्षांपासून फळे येण्यास सुरूवात होतात.  तर प्रति हेक्टर 3 हजार किलो प्रति हेक्टर फळं येण्यास सुरूवात होतात. काही वर्षांनंतर आर्थिक उत्पन्न हे 10 ते 12 टन आहे. या उत्पादनातून 4.8 लाख हेक्टर फायदा होऊ शकतो.

खजूरांच्या जातींविषयी थोडक्यात

खजूरांच्या नर  आणि मादी अशा दोन जाती आहेत. 148 मादी रोपांसह 8 नर रोपं लावणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी 148 नर रोपं घ्यावीत आणि 8 नर रोपं लावावीत.

बाराही, खुनेजी, मेदजूल, खलास, खडरावी, हलवी, सागाई या खजूरांच्या प्रजातीचा समावेश आहे. यासाठी 148 नर रोपांसोबत 8 मादी रोपांची लागवड करवी.

News Title – Government Scheme For Farmers

महत्त्वाच्या बातम्या

“मिर्झापुर सीरिज पाहिलीत तर तुम्हाला उलटी येईल”

लेकापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अडचणीत; ‘त्या’ फोटोने नवा वाद

टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर!

“देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी…”, अमृता फडणवीसांची उखाण्यातून टोलेबाजी

“मला मारून टाका, फासावर लटकवा पण..”, Poonam Pandey ची पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट