मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hybrid Annuity Scheme | राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विरोधक सरकारच्या विकासकामांवर बोट दाखवत आहे तर सत्ताधारी विकासासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद करत आहे. तर विरोधकांच्या सरकारच्या सत्तेवेळी निम्मी विकासाची कामं झाली असल्याचा दावा विरोधकांकडून होत आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे काही निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये हायब्रिड अॅन्युईटीवर याजनेची (Hybrid Annuity Scheme) अधिक चर्चा आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळामध्ये मोठ मोठे निर्णय घेतले आहेत. हायब्रिड अॅन्युईटी (Hybrid Annuity Scheme) या योजनेतून सरकारन रस्त्यांची कामे करून घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तर औद्योगिकरणाचा मुद्द्याला देखील महत्व दिलं आहे, यामध्ये तब्बल 6 हजार किमी रस्त्याचं बांधकाम करण्यात येणार आहे.

हायब्रिड अॅन्युईटी योजनेतून 6 हजार किमी रस्ते बांधणी

हायब्रिड अॅन्युईटी योजनेतून रस्ते बांधणीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 6 हजार किमी रस्ते बांधणी करण्यात आली आहे. तर यासाठी 30 टक्के शासनाचा सहभाग आहे तर 70 टक्के एमआयडीसीचा सहभाग आहे. तर यासाठी सरकारने 28 हजार 500 कोटी रूपयांची मंजूरी दिली आहे. रविवारी झालेल्या मंत्रीमंडळातील सर्वात मोठा निर्णय आहे. या मंत्रीमंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष हे एकनाथ शिंदे आहेत.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ही योजना राबविण्यात येईल. यामध्ये शासनाचा सहभाग 30 टक्के आणि एमएसआयडीसीचा उद्योजक म्हणून सहभाग 70 टक्के असेल. यामध्ये रस्ते, बंदरे, वीज, विमानतळ, मेट्रो अशा विविध पायाभूत सुविधांचा यामध्ये समावेश होतो.

या योजनेतील काम हे ईसीपी तत्वावर राबवण्यात येणार आहे. बांधकामाचा कालावधी हा 2.5 वर्षांचा आहे. तर पुढील 5 वर्षे हे कामातील दोषदायित्वासाठी असेल. याबाबत सर्व माहिती ही सार्वजनिक बांधकाम विभाग ठरवणार आहे.

मंत्रीमंडळातील महत्वाचे निर्णय 

गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी निवडण्यात येणार.

कृषी विद्यापीठातील शिक्षकांचं निवृत्तीचं वय 60 वर्षे.

तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार.

मालमत्ता करात वाढ नाही.

महारोजगार मेळावा होणार आणि 2 लाख रोजगाराच्या संध्या.

ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ देणार.

पायाभूत सुविधा बळकट करणार.

उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान.

मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात.

जुन्नर तालुक्यात बिबट्यांची सफर, पर्यटनाला मंजूरी.

बंजारा, लमाणी समाजाच्या तांड्याचा विकास.

शिर्डी विमानतळ विस्तार, नवीन इमारत बांधणी.

सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते.

स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता.

कोंढाणे लघु प्रकलपाच्या कामास जादा खर्चास मान्यता.

News Titles – Hybrid Annuity Scheme News Update

महत्त्वाच्या बातम्या

58 वर्षांच्या आमिर खानला करायचाय ‘रोमान्स’, थेट म्हणाला…

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ‘तो’ फोटो पाहून नेटकरी झाले चकित!

“मला तुमच्या चित्रपटात घेऊ नका नाहीतर…”, कंगणाचा ‘या’ दिग्दर्शकाला टोला

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजची किंमत

‘तुम्ही आमच्या समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारताय’; भुजबळांचं जरांगेंना उत्तर