“मला तुमच्या चित्रपटात घेऊ नका नाहीतर…”, कंगणाचा ‘या’ दिग्दर्शकाला टोला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kangana Ranaut | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत (Kangana Ranaut) कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांआधी तिनं आयोध्येतील रामलल्लाच्या मंदिरात जय श्रीराम असा नारा लावतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. ती नेहमीच कोणत्या न् कोणत्या वक्तव्यासाठी चर्चेत असते. तिच्या अभिनयानं आणि चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलं आहे. यामुळे आता तिच्यासोबत अॅनिमल चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांना काम करायचं आहे. यावर कंगणाने उत्तर दिलं आहे.

कंगणाचे (Kangana Ranaut) अनेक चित्रपट आहेत. त्यामध्ये तिनं साकारलेली पात्रं ही स्त्रीवादी विचारसरणींची आहेत. तिच्या अनेक चित्रपटांमध्ये तिनं स्त्रीवादी भूमिका केल्या आहेत. खऱ्या आयुष्यतही ती स्त्रीवादी विचारसरणींना घेऊन आपलं आयुष्य जगते. अशातच आता ती पुन्हा एकदा याच मुद्यावरून संदीप वांगा रेड्डी या दिग्दर्शकाच्या कामाबाबत आणि त्याच्या पुरूषी अहंकारावर उत्तरली आहे.

“कंगणाला नक्कीच कथा ऐकवेल”

अॅनिमलचा दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डीनं कंगणा रणौतचं कौतुक केलं आहे. तिचं काम आवडत असल्याची प्रतिक्रिय दिली आहे. “तिचं क्वीन चित्रपटातील काम पाहिलं आहे आणि ते आवडतंही. ती एखाद्या भूमिकेसाठी फिट बसत असेल तर मी नक्कीच कथा ऐकवेल. तिनं जरीही अॅनिमलबाबत नकारात्मक कमेंट दिली असली तरीही मला वाईट वाटणार नाही”, असं संदीप वांगा रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली कंगणा? (Kangana Ranaut)

संदीप वांगा रेड्डी यांच्या प्रतिक्रियेनंतर कंगणाने त्यांना उत्तर दिलंय. परिक्षण आणि निंदा करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक कलेची चर्चा झाली पाहिजे. मी केलेल्या परिक्षणाचा संदीप वांगा रेड्डी यांनी आदर केला. ते मर्दानी चित्रपट बनवत नाहीत तर त्याचं वागणंही मर्दानी आहे असं आपण म्हणू शकतो, अशी इंस्टाग्राम पोस्ट केली आहे.

kangana on sandeep reddy 2024021171443

 

“कृपया मला तुमच्या सिनेमात घेऊ नका नाहीतर…”

त्यानंतर कंगणा म्हणाली की “कृपया मला आपल्या सिनेमामध्ये घेऊ नका. नाहीतर तुमचे अल्फा हिरो स्त्रीवादी होऊन जातील. तुमचे चित्रपटही आपटतील. तुम्ही ब्लॉकब्लास्टर सिनेमे बनवा इंडस्ट्रिला तुमची गरज आहे.”

अॅनिमल चित्रपटावर टीकांचा पाऊस

अॅनिमल चित्रपटाचं कौतुक देखील झालं होतं आणि टीका देखील करण्यात आल्या होत्या. चित्रपटातील अभिनेते बॉबी देओल, रणबीर कपूर यांच्या भूमिकेनं पुरूषप्रधानतेचा जागर केला असल्याच्या चर्चा होत आहेत. यावरूनच दिग्दर्शकावर देखील टीका होत होत्या. रेड्डी यांच्या कबीर सिंगमध्ये देखील पुरूषी अहंकार दाखवण्यात आला असल्याच्या चर्चा होत्या.

News Title – Kangana Raut Ignore To sandeep vanga reddy’s Film

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर!

“देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी…”, अमृता फडणवीसांची उखाण्यातून टोलेबाजी

“मला मारून टाका, फासावर लटकवा पण..”, Poonam Pandey ची पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट

घटस्फोटानंतर किरण सोबतच्या नात्याबाबत आमिर खानचा मोठा खुलासा, म्हणाला..

रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढलं?, मोठा खुलासा आला