केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ‘तो’ फोटो पाहून नेटकरी झाले चकित!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Smriti Irani | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा प्रवास अचंबित करणारा आहे. सध्या त्या देशाच्या केंद्रीय मंत्री आहेत. मात्र, त्यांनी टीव्ही मालिकेपासून आपल्या करीअरची सुरुवात केली आहे. त्यांनी मॉडेलिंगही केली आहे. त्यांनी (Smriti Irani )आपल्या अभिनयाने आणि अदांनी एक काल गाजवला आहे. आजही त्यांचे अनेक चाहते पाहायला मिळतात.

नुकताच स्मृती इराणी यांनी आपला एक जुना फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो बघून नेटकरी चकित झाले आहेत. सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. स्मृती इराणी यांचा हा 21 वर्षे जुना फोटो आहे. त्यात त्या खूपच सुंदर दिसून येत आहेत.

स्मृती इराणी यांची पोस्ट चर्चेत

सोशल मीडियावर सध्या थ्रोबॅक फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड सुरू आहे. हा ट्रेंड स्मृती इराणी (Smriti Irani) यांनीही फॉलो केला. त्यांनी आपला 21 वर्ष जुना फोटो पोस्ट केला. तेव्हा त्या मॉडेलिंग करत होत्या. यात त्या फ्लोअर आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. त्यांच्या या फोटोला अनेक कलाकारांनीही कमेन्ट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

मंदिरा बेदीने वॉव, हा फोटो खूपच गोड आहे असं म्हटलं. तर, मनिष पॉलने अरे वा म्हणत कमेंट केली आहे. तर काही युजरने आता तो निरासगसपणा हरवला असल्याचं म्हटलं. तर कुणी तुम्ही माझ्या फेवरेट असल्याचं म्हटलं आहे. स्मृती इराणी यांच्या सौंदर्याचंही कौतुक केलं जात आहे.

मालिकेपासून मिळाली प्रसिद्धी

स्मृती इराणी (Smriti Irani ) यांनी एकता कपूरच्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेत काम केलं आहे. या मालिकेत त्यांची ‘तुलसी’ ही भूमिका खूप प्रसिद्ध झाली होती. यातूनच त्यांना नवीन ओळख मिळाली होती. पुढे 2003 साली भाजपत प्रवेश करत त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.

2004 मध्ये त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळालं होतं. परंतु त्यांचा पराभव झाला. यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल गांधींविरोधात त्यांनी अमेठीमधून निवडणूक लढवत विजय मिळवला. आता त्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत.

News Title – Smriti Irani post goes viral

महत्त्वाच्या बातम्या-

लेकापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अडचणीत; ‘त्या’ फोटोने नवा वाद

टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर!

“देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी…”, अमृता फडणवीसांची उखाण्यातून टोलेबाजी

“मला मारून टाका, फासावर लटकवा पण..”, Poonam Pandey ची पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट

घटस्फोटानंतर किरण सोबतच्या नात्याबाबत आमिर खानचा मोठा खुलासा, म्हणाला..