ईशा देओल आणि भरत तख्तानी झाले विभक्त; लग्नाच्या 11 वर्षानंतर घटस्फोट, कारणही सांगितलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Esha Deol Bharat Takhtani | मागील काही दिवसांपासून ईशा देओल घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत होती. पण आता ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी कन्फर्म केले असून ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. ‘दिल्ली टाइम्स’च्या वृत्तानुसार त्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. निवेदनात लिहिले आहे की, आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आता एकत्र नसलो तरी आमच्या दोन मुलांचे भविष्य आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे आणि राहील. आम्हाला आशा आहे की तुम्ही आमच्या गोपनीयतेचा आदर कराल.

ईशा देओल आणि भरत तख्तानी वेगळे झाल्याच्या बातम्या काही दिवसांपासून चर्चेत होत्या. खरं तर ईशा देओल अनेकदा तिच्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मात्र काही काळापासून तिने हे बंद केले होते. अशा स्थितीत या जोडप्यामध्ये कदाचित सर्व काही ठीक नसावे असा अंदाज लोक बांधू लागले होते.

लग्नाच्या 11 वर्षानंतर झाले विभक्त

बहुतांश पार्टी आणि फंक्शन्समध्ये ईशा तिची आई हेमा मालिनी यांच्यासोबत दिसली. हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कुटुंब उपस्थित असताना भरत तख्तानी मात्र उपस्थित नव्हता. ईशा देओलने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘कोई मेरे दिल से पूछे’ या पदार्पणाच्या चित्रपटाची एक व्हिडीओ क्लिप शेअर केली.

तिने कॅप्शनच्या माध्यमातून लिहले की, कधी कधी तुम्हाला गोष्टी सोडून द्याव्या लागतात आणि तुमच्या हृदयाच्या ठोक्यावर त्यानुसार नाचावे लागते. मी 18 वर्षांची असताना माझ्या पहिल्या चित्रपटाचा हा थ्रोबॅक आहे. हा माझा पहिला चित्रपट होता आणि त्यामुळे तो नेहमीच खास राहील यात शंका नाही.

Esha Deol Bharat Takhtani यांचा घटस्फोट

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी 29 जून 2012 रोजी मुंबईत लग्न केले. दोघांनी मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात लग्न केले. ईशा आणि भरत हे बालपणीचे मित्र होते. भरतला सुरुवातीपासूनच ईशा आवडायची. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

 

लग्नाच्या पाच वर्षानंतर 2017 मध्ये ईशाने मुलगी राध्याला जन्म दिला. 2019 मध्ये ईशाने तिची दुसरी मुलगी मिरायाला जन्म दिला. पण, आता हे जोडपे वेगळे झाले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा अखेर खऱ्या ठरल्या आहेत. ईशा आणि भरत लग्नाच्या 11 वर्षांनंतर वेगळे झाले आहेत.

News Title- Bollywood actress Esha Deol and Bharat Takhtani got divorced after 11 years of marriage
महत्त्वाच्या बातम्या –

Education | आंदोलन केल्यास नोकरी जाऊ शकते; नोकरदार शिक्षकांना सरकारचा गंभीर इशारा

बीडचा ‘सचिन’ चमकला! मराठमोळ्या खेळाडूच्या जोरावर भारताची युवा ब्रिगेड वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये

नांदेड सिटीतील रहिवाशांनी घेतली आयुक्तांची भेट, वाचा कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा

घड्याळाचे काटे फिरले…, शरद पवारांना मोठा झटका; चिन्ह, पक्ष अजित पवारांकडेच

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, एकनाथ शिंदेंनी केली घोषणा