‘…हे चुकीचं आहे’; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य

NCP

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं (NCP) नाव आणि चिन्हावर अखेर निवडणूक आयोगाने निकाल दिला. या निकालानुसार घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष (NCP) हा अजित पवार यांना मिळाला आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान आयोगाने निकाल जाहीर केल्यानंतर यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य

कालच्या निकालामुळे लोकशाहीची अधःपतन झालं आहे. शिवाय घटनेची पायमल्ली झाली आहे. सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द झाला पाहिजे. शिवाय कोर्टाने पक्षांतरबंदी कायद्यात स्पष्टता आणली पाहिजे. ज्याच्याकडे बहुमत त्याच्या बाजूने निकाल देणं चुकीचं आहे, असं उल्हास बापटांनी म्हटलंय.

कालच्या निकालाचा विधानसभा अध्यक्षांवर परिणाम होणार नाही, मात्र ते काय निकाल देतील ते आपल्याला माहिती आहे, असं उल्हास बापट म्हणाले आहेत.

निवडणूक आयोगाचा निर्णय

केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार (Ajit pawar) यांच्या गटाला अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे अजित पवार गटाचा पुढचा प्रवास सोपा झाला आहे. तेच शरद पवारांना नव्याने सर्व पट मांडावा लागणार आहे. आज दुपारपर्यंत त्यांना नवीन गटासाठी नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाला कळवाव लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हक्क कुणाचा? यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली होती. बरेच महिने सुनावणी चालली. अखेर निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्याबळ पाहता अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे शरद पवार यांच्यासमोर आता मोठ आव्हान उभ राहिलं आहे. त्याने नव्याने सगळी बांधणी करावी लागणार आहे. शरद पवार यांचा मानणारा सुद्धा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. शरद पवार यांना नव्याने नेते आणि कार्यकर्त्यांची फळी उभारावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

“काकांनी उभा केलेला पक्ष हिसकावणं सोप्प आहे पण…”

कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर!; संभाजीराजे छत्रपती नॉट रीचेबल

इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे गोंधळले, दिलं भलतंच उत्तर

“…तर आम्ही उपकार विसरणार नाही”, भुजबळांनी मनोज जरांगेंना केली ‘ही’ विनंती

मुंबईतील CSMT रेल्वे स्थानकात चोरी; स्वच्छतागृहातील 12 लाख रुपयांचे साहित्य लंपास

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .