पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. हळूहळू उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मात्र कडक उन्हाळा अद्याप सुरूही झाला नाही की, तेच पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पुण्याच्या (Pune News) नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा कमी पाणीसाठा असल्याने पाण्याचे संकट ओढण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे पुण्यातील काही भागांचे पाणीकपात केली जाऊ शकते. यामुळे पुणे महापालिकेणे पाणीपुरवठामध्येही काही बदल केले आहेत. तसेच, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहनही करण्यात आलं आहेत.

‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (8 फेब्रुवारी) पुण्यातील (Pune News)) काही भागामध्ये पाणीकपात केली जाणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवार सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती HLR टाकीसाठी दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुण्यामधील (Pune News)) अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, डायस प्लॉट, ढोले मळा परिसर, सॅलेसबरी पार्क, गिरीधरभवन चौक परिसर, पर्वती HLR टाकी परिसर – सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर (काही भाग), महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर 1 आणि 2, लेक टाऊन परिसर, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द (सर्वे नं. 42,46), पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परिसर, धनकवडी परिसर.

नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन

उन्हाळा अजून सुरूही नाही झाला की लगेच पाणी टंचाई जाणवू लागल्याने मोठे नियोजन करावं लागणार आहे. यासाठी पुण्यातील नागरिकांना (Pune News)) पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. तसेच या पाण्याचा वापर देखील योग्य प्रमाणात करावा लागणार आहे. सध्या उपलब्ध पाणी साठा जेवढा आहे, त्या हिशोबाने मनपाने नियोजन केलं आहे.

News Title-  Pune News Water supply to some parts of Pune stopped on February 8

महत्त्वाच्या बातम्या –

“…तर आम्ही उपकार विसरणार नाही”, भुजबळांनी मनोज जरांगेंना केली ‘ही’ विनंती

मुंबईतील CSMT रेल्वे स्थानकात चोरी; स्वच्छतागृहातील 12 लाख रुपयांचे साहित्य लंपास

77 वर्षीय वृद्धाची 22 वर्षीय तरुणीसोबत INSTA वर मैत्री; बंगल्यावर हत्या, आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात

“हे आधीच पाहिलंय”, मास्टर ब्लास्टर आणि बीडचा ‘सचिन’, IPL फ्रँचायझीकडून खास कौतुक!

लग्नाचे आमिष दाखवले! महिला खेळाडूसोबत शरीरसंबंध; भारताच्या हॉकीपटूवर बलात्काराचा गुन्हा