घटस्फोटानंतर भरत तख्तानीबाबत Esha Deol ने केला मोठा खुलासा!

Esha Deol Divorce | गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेत्री ईशा देओलच्या (Esha Deol Divorce) घटस्फोटाच्या चर्चा रंगत होत्या. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी घटस्फोट घेतला असल्याचं कन्फर्म केलं आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आता एकत्र नसलो तरी आमच्या दोन मुलांचं भविष्य आमच्यासाठी सर्वात महत्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

यानंतर ईशाने भरतबद्दल मोठा खुलासा केला आहे. भरतच्या वागण्याबाबत तिने धक्कादायक खुलासे केले आहेत. ईशाने ‘अम्मा मिया : स्टोरीज, अॅडवाइस अँड रेसिपी’ या तिच्या पुस्तकात दोघांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे सध्या याचीही चर्चा होत आहे.

काय म्हणाली ईशा देओल?

ईशा (Esha Deol Divorce ) आणि भरत यांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत. मात्र, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर भरतला माझ्याकडून दुर्लक्षित झाल्यासारखं वाटायचं, असं तिने पुस्तकात म्हटलं आहे. मी त्याला वेळ देत नसल्याचं त्याला वाटायचं. यामुळे आमच्यात दुरावा निर्माण झाल्याचं अभिनेत्री सांगते.

एखाद्या पतीला असं वाटणं साहजिक आहे. मी राध्याची शाळा आणि मियाराच्या संगोपनामध्ये अधिक व्यस्त असायची. यावेळी मी माझं पुस्तकही लिहायची. वैयक्तिक आयुष्यासोबतच मला माझ्या कामावरही लक्ष द्यावं लागायचं. माझ्या प्रोडक्शनच्या मिटिंग्सही सुरू होत्या, असं ईशाने पुस्तकात सांगितलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

एकदा भरतने माझ्याकडे नवीन टुथब्रश मागितला होता आणि मी विसरून गेले. त्याचा शर्ट मी इस्त्री केलेला नव्हता. त्याला डब्यात काय दिलंय हे चेक न करताच मी ऑफिसला पाठवलं होतं. त्याच्या गरजा खूप नाहीत. पण, त्याला काही खटकलं तर तो लगेच माझ्याशी व्यक्त व्हायचा. आम्ही दोघे बरीच दिवस कुठे फिरायलाही गेलो नाही. पुढे मग मी विकेंडला त्याच्यासोबत फिरायला जायची, असा खुलासा ईशाने केला आहे.

Esha Deol Bharat Takhtani झाले विभक्त

2012 साली ईशा (Esha Deol Divorce ) आणि भरत यांनी विवाह केला होता. लग्नापुर्वी ते बरीच वर्ष नात्यात होते. ईशा आणि भरत हे बालपणीचे मित्र होते. भरतला सुरुवातीपासूनच ईशा आवडायची. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.मात्र, आता त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या पाच वर्षानंतर 2017 मध्ये ईशाने मुलगी राध्याला जन्म दिला. 2019 मध्ये ईशाने तिची दुसरी मुलगी मिरायाला जन्म दिला.

News Title-  Esha Deol Divorce big revelation about Bharat Takhtani

महत्त्वाच्या बातम्या –

कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर!; संभाजीराजे छत्रपती नॉट रीचेबल

इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे गोंधळले, दिलं भलतंच उत्तर

“…तर आम्ही उपकार विसरणार नाही”, भुजबळांनी मनोज जरांगेंना केली ‘ही’ विनंती

मुंबईतील CSMT रेल्वे स्थानकात चोरी; स्वच्छतागृहातील 12 लाख रुपयांचे साहित्य लंपास

77 वर्षीय वृद्धाची 22 वर्षीय तरुणीसोबत INSTA वर मैत्री; बंगल्यावर हत्या, आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात