“जो आपला झाला नाही, तो जनतेचा काय होणार”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

NCP Party Symbol | गेल्या काही महिन्यांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदार आणि खासदारांसह  शिवसेना आणि भाजपसोबत युती केली होती. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर (NCP Party Symbol)  दावा केला. त्यानंतर हे प्रकरण आयोगासमोर केलं होतं. आता निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अधिकृतरीत्या अजित पवारांचा आहे, असं निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालावर अजित पवारांविरोधात बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.

शरद पवारांच्या घराबाहेर बॅनरबाजी

निवडणूक आयोगानं 6 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे, असा निकाल दिला. यावर राज्यभरातून आणि देशभरातून नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आनंद साजरा केला तर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात दिल्ली येथील निवासस्थानी बॅनरबाजी केली आहे.

काय लिहिलं बॅनरमध्ये

“जो अपना नही हुआ वो जनता का क्यो होगा”, असा आशय त्या बॅनरमध्ये लिहिण्यात आला. शरद पवार यांच्या दिल्लीतील घराबाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे आनंद तर दुसरीकडे निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालावर आणि अजित पवारांवर टीका केली.

दोन्ही गटानं पक्ष आणि चिन्हावर (NCP Party Symbol) दावा ठोकला होता. यावर काही महिन्यांपासून निवडणूक आयोगामध्ये दोन्ही गटांनी धाव घेतली होती. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाच्या निकालाच्या आधारावर न्याय दिला. तसेच लोकसभा आणि विधानसभेतील बहुमत हे अजित पवार गटाच्या बाजून असल्यानं निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाचा मालकी हक्का अजित पवारांना दिला आहे.

शरद पवारांना पक्ष बांधणी करावी लागणार

अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा अधिकृत पक्ष असल्याचं निवडणूक आयोगानं निकाल दिल्यापासून शरद पवार गटाच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे. यामुळे शरद पवार गटाला आगामी निवडणुकीसाठी पक्ष बांधणी करावी लागणार आहे.

अजित पवारांचा मार्ग मोकळा

अजित पवारांच्या बाजूनं निवडणूक आयोगानं निकाल दिला आहे. अजित पवारांना निवडणूक लढवण्यासाठी पक्ष बांधणी करावी लागणार नाही. मात्र शरद पवार यांना पक्ष बांधणी करावी लागणा आहे. अजित पवारांना लोकसभा आणि राज्यासभा निवडणूक लढवण्यासाठी सोईस्कर झालं आहे.

News Titles – NCP Party Symbol Result on Ajit pawar against banner

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर!; संभाजीराजे छत्रपती नॉट रीचेबल

इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे गोंधळले, दिलं भलतंच उत्तर

“…तर आम्ही उपकार विसरणार नाही”, भुजबळांनी मनोज जरांगेंना केली ‘ही’ विनंती

मुंबईतील CSMT रेल्वे स्थानकात चोरी; स्वच्छतागृहातील 12 लाख रुपयांचे साहित्य लंपास

77 वर्षीय वृद्धाची 22 वर्षीय तरुणीसोबत INSTA वर मैत्री; बंगल्यावर हत्या, आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात