इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे गोंधळले, दिलं भलतंच उत्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Narayan Rane |  केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना राज्यसभेमध्ये भाजप खासदार कार्तिकेय शर्माने इंग्रजीत प्रश्न विचारला असता नारायण राणेंचा गोंधळ उडाला आहे. त्यावर त्यांनी भलतंच उत्तर दिलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही माध्यमांनी देखील हा व्हिडीओ प्रसारीत केला आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नेमकं काय झालं?

नारायण राणे यांना आपल्या क्षेत्रातील संबंधीत प्रश्न विचारला. MSME क्षेत्राबाबत कामगार कल्याणासाठी काय पावलं उचलणार? पण राणेंनी नेमकं काय विचारलं हेच कळलं नाही. त्यामुळे त्यांचा काहीसा गोंधल उडाला. यानंतर त्यांनी आपली यादी वाचवण्याची विनंती केली. “MSME क्षेत्राला चालणा देण्यासाठी आपण काय केलं याची यादी त्यांनी सभापतींच्या परवानगीनं वाचून दाखवू इच्छितो”.

राणेंच्या उत्तरावर विरोधकांचा गोंधळ

राणेंनी आपल्या खात्याची माहिती द्यायला सुरूवात केली. यामुळे राज्यसभेमध्ये गोंधळ झाला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, अशी मागणी केली आहे. त्यानंतर सभापतींनी त्यांना प्रश्न नेमका काय आहे? हे पुन्हा एकदा हिंदीतून समजावून सांगितलं. त्यावर राणे म्हणाले की मी वाचून दाखवतो. याप्रकरणावर नारायण राणेंवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे.

राणेंवर अंजली दमानियांचा हल्लाबोल

व्हिडीओ शेअर करत दमानिया यांनी राणेंचा समाचार घेतला आहे. ज्यांना प्रश्न देखील कळत नाही ते MSME ना काय दिशा देणार आहेत? राजकारणात आणि बॉसचा वरदहस्त कधी चालणार नाही, अशा शब्दात राणेंवर टीकेची तोफ डागली आहे.

Image

भुजबळांबाबत गोप्यस्फोट

छगन भुजबळांबाबत अंजली दमानिया यांनी काही दिवसांआधी मोठा खुलासा केला होता. त्यांनी भुजबळांबाबत ट्विट केलं होतं, दमानिया म्हणाल्या की, “छगन भुजबळ हे सध्या भाजपच्या वाटेवर जाणार आहेत. भ्रष्ट नेत्याला मोठं करणार, ओबीसी नेते बनवणार केवळ राजकारणासाठी कुठं फेडाल हे पाप” यावर पुन्हा छगन भुजबळ यांनी स्पष्टोक्ती दिली आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

अंजली दमानिया यांनी केलेल्या भुजबळांच्या गोप्यस्फोटावर आता भुजबळ यांनी स्पष्टोक्ती दिली आहे. ते म्हणाले की, “मला भाजपच्या ऑफरबद्दल माहिती नाही. ही माहिती दमानियांना कशी मिळाली? मला कोणत्याही पदाची हौस नाही. मी गेल्या काही वर्षांपासून ओबीसी समाजासाठी काम करत आहे.”

News Title – Narayan Rane Confuse Between talk In English at Rajyasabha

महत्त्वाच्या बातम्या 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

‘खूप काही चुकीचं…’; रोहित शर्माची पत्नी रितीकाच्या कमेंटने खळबळ

माझ्या मुलीला डॉक्टरांच्या हातात देताना….’; मुलीच्या ओपन हार्ट सर्जरीबाबत करण सिंह ग्रोवरचा मोठा खुलासा

58 वर्षांच्या आमिर खानला करायचाय ‘रोमान्स’, थेट म्हणाला…

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ‘तो’ फोटो पाहून नेटकरी झाले चकित!