“महाराष्ट्राला दिल्लीकडून मिळणारा दगा नवा नाही, कालही आणि आजही…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amol Kolhe | केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी (NCP Crisis) असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयाचा विरोधकांकडूनही निषेध केला जात आहे. यावरूनच आता खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनीही आपला संताप व्यक्त केला आहे.

अमोल कोल्हे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी या सर्व प्रकरणाचं दिल्ली कनेक्शन असल्याचं अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलं आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांची पोस्ट चर्चेत आली आहे. पक्ष संस्थापकालाच राष्ट्रवादीतून बाहेर पाडण्याच्या या निकालावर विरोधकही तोंडसुख घेत आहेत.

अमोल कोल्हे अजित पवारांवर भडकले

प्रादेशिक पक्षांनी महाराष्ट्राच्या हितासाठी भांडू नये म्हणून त्यांना मोडीत काढण्याचं काम केलं जात आहे. महाराष्ट्राच्या वाट्याचं जेव्हा हिरावलं जातं तेव्हा कुणीही शब्द काढत नाही, असा टोला यावेळी अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी एक्सवरही (पूर्वीचे ट्वीटर) एक पोस्ट केली आहे.

“दिल्लीचा दगा महाराष्ट्राला नवा नाही कालही… आजही…!”, अशा आशयाची पोस्ट अमोल कोल्हे यांनी केली आहे. यासोबतच त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. अमोल कोल्हे छत्रपती संभाजीराजे यांच्या वेशात दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी आणि शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी प्रादेशिक पक्ष राहू नये, हीच केंद्राची भूमिका यातून दिसून येते आहे.मात्र, या महाराष्ट्राला छ्त्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवलाय. हम लढेंगे और जितेंगे, असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत. आता यावर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया मिळणार, हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

‘राष्ट्रवादी’ दादांचीच

दरम्यान, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा (NCP Crisis) हा निर्णय शिवसेना पक्षाच्या निकालाआधारे दिला आहे. आमदारांची संख्याबळ ही अजित पवार गटाची अधिक असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. यामुळे आता पक्ष आणि चिन्हाचे दावेदार हे अजित पवार आहेत. तसेच शरद पवार यांचा वेगळा गट असावा नाहीतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा निकाल निवडणूक आयोगानं दिला आहे. या निर्णयाचा अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी निषेध केला आहे.

News Title-  Amol Kolhe criticizes Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या –

“काकांनी उभा केलेला पक्ष हिसकावणं सोप्प आहे पण…”

कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर!; संभाजीराजे छत्रपती नॉट रीचेबल

इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे गोंधळले, दिलं भलतंच उत्तर

“…तर आम्ही उपकार विसरणार नाही”, भुजबळांनी मनोज जरांगेंना केली ‘ही’ विनंती

मुंबईतील CSMT रेल्वे स्थानकात चोरी; स्वच्छतागृहातील 12 लाख रुपयांचे साहित्य लंपास