Rohit Pawar | निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालानं राजकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीनं पक्ष स्थापन केला. त्याच्याच हातातून पक्ष गेला. निवडणूक आयोगाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्हावर झालेला निकाल हा धक्कदायक आहे. अजित पवार यांना पक्षाचा मालकी हक्क मिळाला आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. यावर आता शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
काय म्हणाले रोहित पवार? (Rohit Pawar)
“निवडणूक आयोगाच्या पक्षाप्रती आणि चिन्हाप्रती जो निर्णय घेण्यात आला त्यावर आता रोहित पवार यांनी सडकून टीका केली आहे. निवडणूक आयोग हे भाजपचं विंग झालं आहे. इलेक्शन कमिशनच्या नियुक्तीचा अधिकार हा पूर्णपणे सत्तेतील लोकांचा आहे. त्यामुळे कालच्या निकालावर काय बोलणार?” असा सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे.
“आमच्याकडे बापमाणूस आहे”
“असंविधानिक पद्धतीनं फुटीर गटाला पार्टी आणि चिन्ह दिलं आहे. ज्या माणसानं पार्टी सुरू केली तो बाप माणूस आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्हाला कशाचीही भीती नाही”, असं रोहित पवार म्हणाले आहेत. यावर आता रोहित पवार यांनी महाभारतातील उदाहरण देत अजित पवार यांना धारेवर धरलं आहे.
रोहित पवार ट्विट
“महाभारतात घडलेल्या प्रसंगाप्रमाणेच आज राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आहे. कुरुक्षेत्रावरील लढाईपूर्वी दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गेले त्यावेळी भगवान श्रीकृष्ण झोपले असल्याने त्यांची झोप होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय या दोघांकडे पर्याय नव्हता. दुर्योधनाच्या मनात खच्चून अहंकार भरलेला असल्याने तो भगवान श्रीकृष्णाच्या पायाजवळ न बसता उशाजवळ बसला पण अंगी कमालीची नम्रता असल्याने अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या पायाशी बसला… भगवान श्रीकृष्णाने झोपेतून डोळे उघडताच त्याला प्रथम पायाशी बसलेला अर्जुन दिसला आणि त्याला विचारलं तुला काय पाहीजे? तेंव्हा अर्जुनाने सांगितलं तुमचं मार्गदर्शन आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला होकार दिला”.
“नंतर श्रीकृष्णाची नजर उशाशी बसलेल्या दुर्योधनाकडे गेली असता त्यालाही विचारलं तुला काय हवंय? यावेळी अहंकाराने मदमस्त झालेल्या दुर्योधनाने विचार केला एकट्या श्रीकृष्णाला आपल्या सोबत घेण्याऐवजी त्याची विराट नारायणी सेना घेतलेली कधीही फायदेशीर ठरेल. म्हणून स्वार्थी विचाराच्या दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाकडे त्यांची नारायणी सेना मागितली आणि भगवान श्रीकृष्णानेही ती दिली.”
“अखेर एका बाजूला भगवान श्रीकृष्णाचं मार्गदर्शन लाभलेला अर्जुन तर दुसऱ्या बाजूला विराट नारायणी सेना सोबत असलेला दुर्योधन यांच्यात कुरुक्षेत्रावर झालेल्या तुंबळ युद्धात विजय हा अर्जुनाचाच झाला…कारण त्याच्या बाजूने साक्षात भगवान श्रीकृष्ण होते….राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही आज हेच घडतंय..‘महाशक्ती’च्या माध्यमातून नारायणी सेना त्यांच्या बाजूने असली तरी श्रीकृष्णाने जसं अर्जुनाला मार्गदर्शन केलं त्यातून प्रेरणा घेऊन आदरणीय पवार साहेब हे आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकीय कुरुक्षेत्रावर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि अहंकाराला गाडण्यासाठी लढतोय आणि शेवटी विजय आमचाच होणार!”
महाभारतात घडलेल्या प्रसंगाप्रमाणेच आज राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आहे. कुरुक्षेत्रावरील लढाईपूर्वी दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गेले त्यावेळी भगवान श्रीकृष्ण झोपले असल्याने त्यांची झोप होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय या दोघांकडे पर्याय नव्हता. दुर्योधनाच्या… pic.twitter.com/BNM65ZRHPM
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 7, 2024
News Title – Rohit Pawar Angry On Election Commision And Ajit pawar
महत्त्वाच्या बातम्या
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
‘…हे चुकीचं आहे’; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य
“काकांनी उभा केलेला पक्ष हिसकावणं सोप्प आहे पण…”
कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर!; संभाजीराजे छत्रपती नॉट रीचेबल
इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे गोंधळले, दिलं भलतंच उत्तर