अजित पवारांचं ठरलंय, ‘या’ बड्या नेत्याला पाडणार म्हणजे पाडणारच; पवार कुटुंबातील व्यक्ती मैदानात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shirur Assembly Election | आगामी लोकसभा निवडणुकांचे (Shirur Assembly Election) वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून आहेत. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालावर देशभर चर्चा होताना दिसत आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवारांचा हक्क असल्याचं बोललं जात आहे. यामुळे आता शरद पवार यांच्या डोकेदुखीत वाढ झाली असून आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

अजित पवारांना राष्ट्रवादी पक्षाचा दावेदार पाहिलं जाणार असल्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. अशा परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यातच लागतील. यामुळे अजित पवार हे बारामतीमध्ये आपली बहिण सुप्रिया सुळेंविरोधात कोणाला संधी देणार आणि निवडून आणणार? याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही. मात्र अमोल कोल्हेंविरोधात पार्थ पवार हे शिरूर मतदारसंघामध्ये (Shirur Assembly Election) निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत.

पार्थ पवार विरुद्ध अमोल कोल्हे? 

काही दिवसांआधी शिरूर लोकसभा निवडणुकीबाबत अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं. अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजेच पाडणार. यामुळे आता अजित पवार बारामतीप्रमाणे शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंविरोधात मुलगा पार्थ पवार यांना उभं करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार, मुलगा पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. ते लोकांच्या सानिध्यात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. यामुळे याचा तर्कवितर्क हा शिरूर लोकसभा निवडणुकीशी लावण्यात येत आहे. कारण अजित पवार यांनी काही दिवसांआधी अमोल कोल्हेंविरोधात उमेदवार उभा करून कोल्हेंना शिरूर मतदारसंघात पाडणार असं त्यांनी ओपन चॅलेंज दिलं होतं.

काय म्हणाले होते अजित पवार?

“अमोल कोल्हे यांच्याविरोधामध्ये शिरूर मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करणार आणि पाडणारही. पदयात्रा करताय तर कोणी संघर्ष यात्र करताय. जे करायचं होतं ते याआधी पाच वर्षांमध्ये मतदारसंघामध्ये करणं गरजेचं होतं,” असं अजित पवार म्हणाले.

अमोल कोल्हे आणि शरद पवार यांच्या डोकेदुखीत वाढ

शिरूर मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्या अधिक गाठीभेटी होऊ लागल्या आहे. यामुळे सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. यामुळे आता खासदार अमोल कोल्हे आणि शरद पवार यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे.

News Title – Shirur Assembly Election On Ajit pawar parth pawar meet to voters 

महत्त्वाच्या बातम्या

घटस्फोटानंतर भरत तख्तानीबाबत Esha Deol ने केला मोठा खुलासा!

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

‘…हे चुकीचं आहे’; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य

“काकांनी उभा केलेला पक्ष हिसकावणं सोप्प आहे पण…”