सीमा हैदरची राजकारणात एन्ट्री?; ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Seema Haider | प्रेमासाठी पाकिस्तानवरुन भारतात आलेली सीमा हैदर गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होती. प्रेमासाठी भारतात पळून आल्यापासून सीमा हैदर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. सीमा आणि सचिन यांच्या प्रेमाला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं होतं. सोशल मीडियावर देखील सीमा सक्रिय असते. चाहत्यांसाठी सीमा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रिल्स व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते. सीमा आणि सचिन यांच्या प्रेम कहाणीवर चित्रपट येणार असल्याच्या देखील चर्चा होत्या. मात्र सध्या चर्चा आहेत त्या सीमाच्या राजकारणात एन्ट्री होणार असल्याच्या.

काय आहे नेमकं प्रकरण?

सीमा हैदर (Seema Haider) कोणत्या न कोणत्या कारणातून चर्चेचा विषय ठरत असते. सीमाला चित्रपटात काम करण्यासाठी मागणी देखील केल्याचं समोर आलं होतं. मात्र सीमाला चक्क राजकारणातूनच ऑफर आल्याचं म्हटलं आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये मोठा गेम करताना राष्ट्रीय लोक दल दिसत आहे.

यावेळी सीमा हैदरची भेट देखील घेण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये मथुरामध्ये जिंकण्यासाठी मोठा गेम करताना रालोद दिसत आहे. आणि या गोष्टीसाठी पाकिस्तानमधून भारतामध्ये दाखल झालेल्या सीमा हैदर हिलाच निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उतरवण्यात येणार आहे.

सीमाला कोणी ऑफर केली?

लोकसभा निवडणूकीसाठी पक्षातील सर्वच नेते कंबर कसत आहेत. दरम्यान, याच वेळी रालोदचे प्रदेश उपाध्यक्ष कुंवर नरेंद्र सिंह बोलत असताना सीमा हैदर (Seema Haider) बदल भाष्य केलं. सिंह म्हणाले की, ‘नुकताच आम्ही लोकसभा 2024 साठी सीमा हैदर हिला प्रचारासाठी आमंत्रित केलं आहे. विशेष म्हणजे सीमा हैदर हिने प्रचाराला मथुराला येण्यासाठी होकार देखील दिला आहे. याचा अर्था असा की, रालोदचा प्रचार करत असताना आता सीमा हैदर सुद्धा दिसणार आहे.

सीमा हैदरने व्यक्त केली इच्छा

याच वेळी सीमा हैदरने तिची एक इच्छा व्यक्त केली आहे. बोलत असताना सीमा म्हणाली की, तिला वृंदावन प्रेम मंदिर बघण्याची इच्छा आहे. सीमा हैदर ही रालोदचा प्रचार करताना दिसणार हे स्पष्ट आहे. सध्या सीमा हैदर ही केंद्रबिंदू बनली आहे. अनेक लोक हे सीमा हैदर हिला भेटण्यासाठी तिच्या घरी देखील येतात. सीमा हैदर हिचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना देखील अनेकदा दिसतात.

News Title : seema haider to enter in politics

महत्त्वाच्या बातम्या-

“महाराष्ट्राला दिल्लीकडून मिळणारा दगा नवा नाही, कालही आणि आजही…”

प्रसिद्ध अभिनेत्याकडून शरिर सबंधाची मागणी, अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा

‘कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतात’; वसंत मोरेंच्या व्हॉट्सॲप स्टेटसने खळबळ

ईशा देओल आणि भरत तख्तानीच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर!

राज्यातील निवासी डॉक्टरांचा गंभीर इशारा; सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या