राज्यातील निवासी डॉक्टरांचा गंभीर इशारा; सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या

Doctor Strike | राज्यातील निवासी डॉक्टरांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. राज्य सरकारशी वाटाघाटी फिसकटल्यातर, आज (7 फेब्रुवारी) संपावर जाण्याचा इशारा डॉक्टरांनी (Doctor Strike ) दिला आहे. त्यामुळे शासनाची चांगलीच डोकेदुखी वाढू शकते. या संदर्भात सरकार मार्डसोबत एक बैठक घेणार आहे.

निवासी डॉक्टरांच्या अनेक मागण्या आहेत. मात्र सरकार यावर ठोस भूमिका लवकर घेत नसल्याने त्यांनी संपाचे हत्यार बाहेर काढले आहे. सरकारने आज निर्णय नाही घेतला तर संध्याकाळी पाच वाजेनंतर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवासी डॉक्टरांचा संपावर जाण्याचा इशारा

या संदर्भात आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर सरकार काय भूमिका घेणार , ते जाणून घेतल्यानंतर सांप मागे घेतला जाईल, असं डॉक्टरांच्या संघटनेने म्हटलं आहे.

आज दुपारी 2.30 वाजता मंत्रालयात याची बैठक आयोजित केली आहे. अजित पवार यांनी ही बैठक बोलावली आहे. अजित पवार आणि संघटनेमधील (Doctor Strike) प्रतिनिधीमध्ये इथे चर्चा होईल. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत पुर्वी एक बैठक घेण्यात आली होती. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा ही बैठक होऊ घातली आहे.

आज बैठक होणार

मागच्या वर्षीही मार्डने (Doctor Strike ) या मागण्यांसाठी पुढाकार घेतला होता. तेव्हा काही आश्वासने देण्यात आली होती. त्याच आश्वासनावर विश्वास ठेवत डॉक्टरांनी 3 जानेवारीला संप मागे घेतला होता. आश्वासन देऊन आता वर्ष लोटली. पण, यावर पुढची काहीच भूमिका न घेतल्याने पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

डॉक्टरांच्या मागण्या नेमक्या काय?

निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करावी.
निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा केले जावे.
डॉक्टरांना विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे.
या मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर सायंकाळी पाच वाजल्यापासून बेमुदत संपावर जातील.

News Title-  Doctor Strike Resident doctors in the state warned to go on strike

महत्त्वाच्या बातम्या –

77 वर्षीय वृद्धाची 22 वर्षीय तरुणीसोबत INSTA वर मैत्री; बंगल्यावर हत्या, आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात

“हे आधीच पाहिलंय”, मास्टर ब्लास्टर आणि बीडचा ‘सचिन’, IPL फ्रँचायझीकडून खास कौतुक!

लग्नाचे आमिष दाखवले! महिला खेळाडूसोबत शरीरसंबंध; भारताच्या हॉकीपटूवर बलात्काराचा गुन्हा

ईशा देओल आणि भरत तख्तानी झाले विभक्त; लग्नाच्या 11 वर्षानंतर घटस्फोट, कारणही सांगितलं

Education | आंदोलन केल्यास नोकरी जाऊ शकते; नोकरदार शिक्षकांना सरकारचा गंभीर इशारा