‘कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतात’; वसंत मोरेंच्या व्हॉट्सॲप स्टेटसने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vasant More | मनसेने (Mns) पुणे लोकसभेसाठी जोरदार मोर्चाबांधणी केली आहे. पुणे लोकसभेसाठी राज ठाकरे स्वत: दौरे करत आहेत. तसेच राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांनाही जबाबदारी दिली आहे. मनसेकडून साईनाथ बाबर आणि वसंत मोरे (Vasant More) या दोन्ही नेत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. आता या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देणार त्याचे स्पष्ट संकेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिले.

वसंत मोरेंच्या पोस्टने खळबळ

शर्मिला ठाकरे (Sharamila Thackeray) यांनी पुण्यातील कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं. साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पहायचं आहे. त्यांना आता महापालिकेत पाठवायचं नाही. त्यांना दिल्लीत पाठवलं तर दुधात साखर पडेल, असं त्या म्हणाल्या.

शर्मिला ठाकरे यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. याला कारणही तसंच आहे. काही दिवसांपूर्वी वसंतला मला दिल्लीला पहायचं आहे, असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं होतं. पण आता शर्मिला ठाकरे साईनाथ बाबर यांच्या कार्यक्रमांमध्ये साईनाथ दिल्लीला गेला तर दुधात साखर पडेल अशा प्रकारचं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर वसंत मोरेंनी (Vasant More) सूचक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं आहे.

“कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतात”

मनसे नेते वसंत मोरे यांनी सूचक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच, पण मी पट्टीचा गारुडी आहे, अशा आशयाचं व्हॉट्सअप स्टेटस वसंत मोरे यांनी केलं आहे.

कुणासाठी किती बी करा राव, वेळ आली की फणा काढतातच, पण मी बी पट्टीचा गारुडी आहे, योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार, असं वसंत मोरे यांनी लिहिलं आहे. नेमकं आता हे स्टेटस त्यांनी कोणासाठी ठेवलं आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

शर्मिला ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी लोकसभेत वसंत मोरे ऐवजी साईनाथ बाबर यांना पसंती दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे आता साईनाथ बाबर यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतात

ईशा देओल आणि भरत तख्तानीच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर!

राज्यातील निवासी डॉक्टरांचा गंभीर इशारा; सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या

घड्याळ चिन्हाआधी शरद पवारांच्या पक्षाचं होतं ‘हे’ चिन्ह!

“जो आपला झाला नाही, तो जनतेचा काय होणार”