मोठी बातमी! शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं नाव

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा (NCP Crisis) हा निर्णय शिवसेना पक्षाच्या निकालाआधारे दिला आहे. आमदारांची संख्याबळ ही अजित पवार गटाची अधिक असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. यामुळे आता पक्ष आणि चिन्हाचे दावेदार हे अजित पवार (Ajit Pawar) आहेत. तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांचा वेगळा गट असावा नाहीतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा निकाल निवडणूक आयोगानं दिला आहे.

शरद पवार गटातून मोठी बातमी समोर

आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे सूचवण्याचा पर्याय दिला होता. यासाठी (7 फेब्रुवारी) दुपारपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आजच शरद पवारांना पक्षाचं नाव आणि चिन्ह याची माहिती आयोगाला द्यावी लागणार होती. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

शरद पवार गटाकडून पक्षाच्या नावासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. यामध्ये पहिलं नाव हे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, दुसरं नाव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, तिसरं नाव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदराव पवार असं असल्याची माहिती आता समोर आली आहे.

निवडणूक आयोगाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या नावाला मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं हे नाव फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत मर्यादीत असणार आहे.

Sharad Pawar | शरद पवार ‘या’ चिन्हासाठी आग्रही

वटवृक्ष या चिन्हासाठी शरद पवार (Sharad Pawar) गट आग्रही आहे. आता निवडणूक आयोग याबाबतच्या मागणीवर काय भूमिका घेतं ते पाहणं जास्त महत्त्वाचं असणार आहे. निवडणूक आयोगाला शरद पवार गटाने आतापर्यंत फक्त तीन नावे सूचवली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

सीमा हैदरची राजकारणात एन्ट्री?; ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर

अजित पवारांचं ठरलंय, ‘या’ बड्या नेत्याला पाडणार म्हणजे पाडणारच; पवार कुटुंबातील व्यक्ती मैदानात

“आम्हाला भीती नाही, आमच्याकडे…”, रोहित पवारांनी अजित पवारांना सुनावलं

‘तुम्हाला निर्मात्यासोबत झोपावं लागेल…;’ Ankita Lokhande ने सांगितला कास्टिंग काऊचचा प्रकार

“महाराष्ट्राला दिल्लीकडून मिळणारा दगा नवा नाही, कालही आणि आजही…”