‘बेईमानी ओळखते…’; प्रसिद्ध अभिनेत्रीची थेट अजित पवारांवर टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Tejaswini Pandit | महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अगोदर शिवसेना पक्ष फुटला. मग खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय यायलाच जवळपास दोन वर्षे लागली. तेच राष्ट्रवादी पक्षही फुटला. आता निवडणूक आयोगाने खरी राष्ट्रावादी ही अजित पवार यांची असल्याचं म्हटलं आहे. ज्यांनी पक्ष स्थापन केला ते शरद पवार यांना हा मोठा धक्का बसला आहे. यावर फक्त राजकारणातूनच नाही तर, सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे. तेजस्विनीने (Tejaswini Pandit ) एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) एक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सध्या तेजस्विनीच्या पोस्टची चर्चा होत आहे.

तेजस्विनी पंडितची पोस्ट चर्चेत

“जनता मूर्ख नाही. सगळं जाणते तसेच बेईमानी ओळखते. ही गोष्ट लक्षात ठेवणे!”, अशी पोस्ट तेजस्विनीने केली आहे. तिच्या या पोस्टवर सोशल मिडियावर अनेक कमेन्ट येत आहेत. म्हणूनच जनतेने कधी तुमच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांना कधी साथ दिली नाही, असे एका युजरने म्हटले आहे. तर, दुसऱ्या एका युजरने म्हटले की, ‘बरोबर २०१९ ची निवडणूक आणि मतदान लक्षात आहे लोकांच्या!’, अशा कमेन्ट तेजस्विनीच्या ( (Tejaswini Pandit ) ) पोस्टवर उमटत आहेत.

तेजस्विनीने आपल्या पोस्टमध्ये कुणाचेच नाव घेतले नाही. मात्र, तिने ही पोस्ट सध्याच्या राजकीय परिस्थितीवरच केल्याचे म्हटले जात आहे. तिने अप्रत्यक्षपणे राजकीय स्थितीवर भाष्य केल्याचे म्हटले जातेय. तेजस्विनी नेहमीच चालू घडामोडींवर प्रतिक्रिया देत असते. अशात तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

राष्ट्रवादी पक्षाबाबत EC चा मोठा निर्णय

आमदारांची संख्याबळ ही अजित पवार गटाची अधिक असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. यामुळे आता पक्ष आणि चिन्हाचे दावेदार हे अजित पवार आहेत. तसेच शरद पवार यांचा वेगळा गट असावा नाहीतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा निकाल निवडणूक आयोगानं दिला आहे. या प्रकरणीच तेजस्विनीची (Tejaswini Pandit) पोस्ट व्हायरल होत आहे.

या निर्णयाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. आता या निकालाला पुढे काय वळण मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

News Title- Tejaswini Pandit post on ncp issue

महत्त्वाच्या बातम्या –

“जो आपला झाला नाही, तो जनतेचा काय होणार”

घटस्फोटानंतर भरत तख्तानीबाबत Esha Deol ने केला मोठा खुलासा!

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

‘…हे चुकीचं आहे’; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य

“काकांनी उभा केलेला पक्ष हिसकावणं सोप्प आहे पण…”