रोहित शर्मा का घेत नाही मुंबई इंडियन्ससोबत वाकडं?, मोठं कारण आलं समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | आयपीएल 2024 (IPL 2024) काही दिवसातच सुरू होणार आहे. यंदाच्या हंगामाचा लिलाव देखील झाला आहे. कोट्यवधी रुपयांनी परदेशी खेळाडू विकत घेण्यावरून यंदाच्या आयपीएलची चर्चा होत होती. अशातच या आयपीएलनं अनेक वळणं घेतली आहेत. आयपीएलमधील प्रबळ दावेदार मानण्यात आलेला संघ म्हणजे मुंबई इंडियन्स आहे. या संघाच्या संघमालकानं गेल्या काही दिवसांआधी हार्दिक पांड्याला विंडो ट्रेडच्यामाध्यमातून आपल्या संघामध्ये स्थान दिलं आहे. यानंतर रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरून काढून हार्दिकला (Hardik Pandya) संघाचा कर्णधार म्हणून निवडलं गेलं यावरून मोठा वाद निर्माण झाला.

गेले काही दिवस हे वातावरण शांत होतं मात्र आता पुन्हा एकदा हे प्रकरण बाहेर आलं आहे. यावर सोशल मीडियावर अनेक वादग्रस्l पोस्ट व्हायरल होत होत्या. मुंबई इंडियन्स संघाच्या इंस्टा हँडेलवरून अनेकांनी अनफॉलो केलं असून फेक फॉलोअर्सच्या माध्यमातून फॉलोअर्स वाढवण्याचा प्रकार घडला. याप्रकरणावर मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक बाउचर यांनी देखील वक्तव्य केलं आहे. यानंतर रोहित शर्माच्या पत्नीनं देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली होती. मात्र रोहित शर्मा अजूनही चिडीचूप्प का आहे? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

रोहित शर्मा चिडीचूप

रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेहने  झालेल्या प्रकरणावर “हे सगळं चुक आहे.” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र रोहित शर्मा या प्रकरणावर गप्पा का आहे याचं कारण आता समोर आलं आहे. रोहित शर्माची कोणतीही चूक नसताना त्याला संघाच्या कर्णधापदावरून काढण्यात आलं. यावर तो कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. त्यानं यावर शांत राहणं पसंत केलं आहे.

रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स संघाचा वेगवेगळा चाहता वर्ग आहे. याचा परिणाम हा चाहत्या वर्गावर देखील होऊ शकतो. दोन्ही वर्गांमध्ये वाद विकोपाला जाऊ शकतो. यामुळे तो शांतच राहणं पसंत करत आहे. मात्र इतरही काही कारणं आहेत, त्यामुळे रोहित शर्मा शांत आहे.

रोहित शर्माचं मौन, कारण आलं समोर 

कर्णधारपदावरून काढून टाकलं आणि आपली जागा पांड्याला दिल्यानंतरही रोहित शर्मा इतका शांत कसा?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोहित अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करत आहे. त्याचा खेळही चांगला आहे. तो जर याप्रकरणावर बोलला तर रोहित शर्माचे चाहते आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये वाद होईल. एवढंच नाहीतर संघमालकामध्ये आणि रोहित शर्मामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.

म्हणून रोहित मुंबईशी वाकडं घेणार नाही 

2011 पासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. म्हणजे 13 वर्षे झाली तो मुंबई इंडियन्स संघाकडून आपला खेळ दाखवत आहे. त्यानं संघाला उंचीवर नेलं आहे. जर त्यानं याप्रकरणावर काही वक्तव्य केलं तर रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स संघमालकामधील आतापर्यंतचं असलेलं नातं तुटू शकतं, मात्र ते नातं तोडायचं नसल्यानं तो काहीच बोलत नाही. त्याला सध्या अनेक संघाकडून ऑफर आल्या असतील पण अंबानी आणि त्याच्यातील असलेले चांगले संबंध त्याला तोडायचे नसल्यानं तो शांत आहे.

News Title – IPL 2024 Rohit Sharma no Comments On Hardik pandya captaincy

महत्त्वाच्या बातम्या

सीमा हैदरची राजकारणात एन्ट्री?; ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर

अजित पवारांचं ठरलंय, ‘या’ बड्या नेत्याला पाडणार म्हणजे पाडणारच; पवार कुटुंबातील व्यक्ती मैदानात

“आम्हाला भीती नाही, आमच्याकडे…”, रोहित पवारांनी अजित पवारांना सुनावलं

‘तुम्हाला निर्मात्यासोबत झोपावं लागेल…;’ Ankita Lokhande ने सांगितला कास्टिंग काऊचचा प्रकार

“महाराष्ट्राला दिल्लीकडून मिळणारा दगा नवा नाही, कालही आणि आजही…”