मोठी बातमी! देशातील ‘या’ स्टेडियमचं नाव बदलणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rajkot Stadium | देशामध्ये सध्या टीम इंडिया विरूद्ध इंग्लंड या दोन संघामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. तर दुसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियानं तब्बल 106 धावांनी इंग्लंडचा पराभव करत विजयी पताका फडकवला आहे. पहिल्या सामन्यातील निराशजनक पराभवानंतर इंग्लंडला दुसऱ्या सामन्यामध्ये कमबॅक करत मात दिली आहे. अशातच आता सध्या सुरू असलेल्या मालिकेच्या तिसऱ्या सामन्याच्या तोंडावर राजकोट स्टेडियमचं (Rajkot Stadium) नाव बदललं जाणार आहे.

राजकोट स्टेडियमचं (Rajkot Stadium) बदलणार नाव

भारत आणि इंग्लंड या दोन संघामध्ये तिसरा कसोटी सामना हा सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमला होणार आहे. या सामन्याआधी या स्टेडियमचं नाव बदलून माजी प्रथम श्रेणी खेळाडू आणि वरिष्ठ प्रशासक निरंजन शहा यांचं नाव देण्यात आलं आहे. 14 फेब्रुवारीच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात येणार आहे. याचदिवशी टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये तिसरा सामना होणार आहे. दरम्यान या नावाचं अनावरण हे जय शहा यांच्या हस्ते होणार आहे.

कोण आहेत निरंजन शहा?

राजकोट स्टेडियमला निरंजन शहा यांचं नाव देण्यात येणार आहे. वरिष्ठ क्रिकेट प्रशासकांपैकी ते एक आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये (MCA) अनेक वर्षांपासून त्यांचा अनुभव आहे. त्यांनी 12 प्रथम श्रेणी समाने खेळले आहेत. निरंजन यांच्या मुलाचं नाव हे जयदेव आहे. जयदेवनं आयपीएल देखील खेळली आहे.

यशस्वीची यशस्वी खेळी

टीम इंडियानं दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं. 106 धावांची चांगली खेळी केली आहे. तर या सामन्यामध्ये यशस्वी जैस्वालनं चांगली कामगिरी करत आपल्या कसोटी सामन्याच्या पदार्पणामध्ये 209 धावा करत टीम इंडियाचा हीरो म्हणून पसंतीस आला. त्यानं आपल्या नावाप्रमाणे यशस्वी खेळी केली आहे.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.

News Title – Rajkot Stadium will change name Decision by jay shah

महत्त्वाच्या बातम्या

कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतात

ईशा देओल आणि भरत तख्तानीच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर!

राज्यातील निवासी डॉक्टरांचा गंभीर इशारा; सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या

घड्याळ चिन्हाआधी शरद पवारांच्या पक्षाचं होतं ‘हे’ चिन्ह!

“जो आपला झाला नाही, तो जनतेचा काय होणार”