अभिषेक बच्चनच्या वाढदिवसादिवशी बहिणीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली…

Abhishek Bachchan | अभिनेता अभिषेक बच्चन आणि एश्वर्या राय काही दिवसांपूर्वी तूफान चर्चेत आले होते. या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांच्या नात्यामध्ये काही ठिक नसल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अभिषेकचा वाढदिवस होता. अभिषेकने आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला. या वेळी पत्नी ऐश्वर्या राय, बहिण श्वेता नंदा या कुटुंबीयांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी अभिषेकला (Abhishek Bachchan) सोशल मीडियाच्या माध्यामातून शुभेच्छा दिल्या. मात्र सध्या चर्चा होत आहे ती अभिषेकच्या बहिणीने केलेल्या पोस्टची.

श्वेताने काय पोस्ट केलं?

प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असणारं बच्चन कुटुंब त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलं होतं. या मागं कारण म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा घटस्फोट. मात्र या विषयावर बच्चन (Abhishek Bachchan) कुटुंबातील कोणी सुद्धा भाष्य केलं नाहीये. दरम्यान अभिषेकच्या वाढदिवसादिवशी बहिण श्वेता नंदाने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर स्टोरी लांडगा आणि माधा या दोघांचं उदाहरण देत पोस्ट शेअर केली होती.

या पोस्टमध्ये ‘मादी लांडगा त्या सर्व गोष्टींना मागे टाकते ज्या तिला हरवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा ठिकाणी ती स्वत:ला घेऊन जाते जिथे तिला सावरता येईल असं म्हटलं आहे. पुढे असं देखील म्हटलं आहे की, ‘कदाचित लांडग्यांकडून शिकण्यासारखं काहीतरी आहे किंवा कदाचित आपल्यापैकी काहींनी आधीच ही गोष्ट आधीच शिकली असेल.

श्वेताने केलेली पोस्ट

shweta bachchan e1707308300107

श्वेताच्या त्या पोस्टने वेधलं लक्ष

श्वेताने पोस्ट केलेल्या स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टद्वारे श्वेताने कोणावर निशाणा साधला आहे, हे स्पष्ट नाही. मात्र अभिषेकच्या वाढदिवशीच तिने ही पोस्ट शेअर केल्याने त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे.

श्वेता बच्चन बिनधास्तपणे तिची मतं मांडते. मुलगी नव्या नंदाच्या पॉडकास्ट शोमध्ये तिने नुकतीच हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये श्वेता तिच्या खासगी आयुष्याविषयी आणि समाजाच्या विविध विषयांवर मोकळेपणे व्यक्त झाली.

News Title : during Abhishek Bachchan birthday shweta post a story

महत्त्वाच्या बातम्या-

सीमा हैदरची राजकारणात एन्ट्री?; ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर

अजित पवारांचं ठरलंय, ‘या’ बड्या नेत्याला पाडणार म्हणजे पाडणारच; पवार कुटुंबातील व्यक्ती मैदानात

“आम्हाला भीती नाही, आमच्याकडे…”, रोहित पवारांनी अजित पवारांना सुनावलं

‘तुम्हाला निर्मात्यासोबत झोपावं लागेल…;’ Ankita Lokhande ने सांगितला कास्टिंग काऊचचा प्रकार

“महाराष्ट्राला दिल्लीकडून मिळणारा दगा नवा नाही, कालही आणि आजही…”