पूनम पांडेवर सरकार मोठी जबाबदारी सोपवणार? आरोग्य मंत्रालयाने दिली अपडेट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Poonam Pandey । पूनम पांडे तिच्या मृत्यूच्या अफवेमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. मागील आठवड्यात तिने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली होती. यानंतर पूनम पांडेवर जोरदार टीका होत आहे. अशातच आता एक नवीन बातमी समोर येत आहे. पूनम सरकारच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग जनजागृती मोहिमेची ब्रँड ॲम्बेसेडर बनू शकते, असे बोलले जात आहे.

पूनम पांडे सध्या चर्चेत आहे. आपल्या मृत्यूची खोटी अफवा पसरवून तिने लोकांचे लक्ष वेधले. पूनम सरकारच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग जनजागृती मोहिमेची ब्रँड ॲम्बेसेडर बनू शकते, अशी चर्चा जोर धरत आहे. मात्र, आरोग्य मंत्रालयाने या अफवा फेटाळून लावल्या आहेत. एकूणच पूनमवर सरकारतर्फे कोणतीही जबाबदारी सोपवली जाणार नाही.

आरोग्य मंत्रालयाने दिली अपडेट

माहितीनुसार, पूनम पांडे आणि तिच्या टीमने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूनम पांडेचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील सरकारच्या राष्ट्रीय जनजागृती मोहिमेचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून विचार केला जात नाही. अशी केवळ चर्चा आहे सरकारी पातळीवर याचा विचार नाही.

2 फेब्रुवारीला पूनमचा या आजाराने मृत्यू झाल्याची खोटी बातमी व्हायरल झाली. जेव्हा सत्य बाहेर आले तेव्हा लोकांनी अभिनेत्रीच्या या कृतीला पब्लिसिटी स्टंट म्हटले. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी पूनमवर बरीच टीका केली. पण आपण हे सर्वकाही जनजागृती करण्यासाठी केले असल्याचे स्पष्टीकरण पूनमने दिले.

Poonam Pandey चा स्टंट

मृत्यूची खोटी बातमी पसरवल्यानंतर 3 फेब्रुवारीला पूनम पांडेने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये पूनम असे म्हणाली होती की, सर्व्हायकल कॅन्सरने माझा जीव घेतला नाही, पण खेद वाटतो की हजारो महिलांचा जीव गेला आहे. या आजारापासून बचाव कसा करायचा याची माहिती नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. त्याचा प्रतिबंध शक्य आहे. काही चाचण्या आणि HPV लसीद्वारे या आजारावर मात केली जाऊ शकते. या आजाराने कोणाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री करण्यासाठी आमच्याकडे सर्व साधने उपलब्ध आहेत.

दरम्यान, पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने लोक खूप भावूक झाले होते. पूनमने खरोखरच हे जग सोडले यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. याचे मुख्य कारण म्हणजे पूनम पांडेने अनेक वेळा असे पब्लिसिटी स्टंट केले आहेत जे नंतर खोटे असल्याचे सिद्ध झाले. यावेळी देखील लोकांचा संशय खरा ठरला आणि पूनम खरोखरच जिवंत असल्याचे उघड झाले.

News Title- Talks that Poonam Pandey could become the brand ambassador of a cancer awareness campaign have been dismissed as false by the government’s health ministry
महत्त्वाच्या बातम्या –

‘हा’ खेळाडू पुन्हा होणार पाकिस्तानचा कर्णधार!

पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अमोल मिटकरींची मोठी घोषणा, आता…

अभिषेक बच्चनच्या वाढदिवसादिवशी बहिणीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली…

मोठी बातमी! देशातील ‘या’ स्टेडियमचं नाव बदलणार

रोहित शर्मा का घेत नाही मुंबई इंडियन्ससोबत वाकडं?, मोठं कारण आलं समोर