आता गुन्हेगारांना सुट्टी नाहीच…, पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांनी घेतला धडाकेबाज निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पुण्यात गुंड शरद मोहोळ याची त्याच्याच घरासमोर बंदुकीने गोळ्या झाडत हत्या झाली. शरदच्या जवळच्याच व्यक्तीने त्याचा घात केला. भरदिवसा पुण्यात (Pune News) घडलेल्या या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न विचारण्यात आले. पुण्यात दिवसेंदिवस गुंडगिरी वाढत असल्याचं म्हटलं जात आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-भाजप सरकारला वेठीस धरलं आहे.

आता सरकारने पुण्याचा कारभार डॅशिंग अधिकारी अमितेश कुमार यांच्याकडे सोपवला आहे. पुणे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार (Pune Police Commissioner Amitesh Kumar) यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आता पुण्यातील गुंडगिरी आणि दादागिरी संपवण्यासाठी त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्याचा निर्णय

पुणे (Pune News) शहरात आता क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेत क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन केले जाणार आहे. यासाठी कुख्यात गुंड, रेकॉर्डवरील आणि झोपडपट्टी परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस ठाणे आणि पोलिस चौक्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना काही महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.

यासाठी पुणे पोलिसांनी सलग दोन दिवस गुन्हेगारांची परेड घेतली. यामुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बळ मिळाले आहे.अमितेश कुमार यांनी दोन दिवस गुन्हेगारांची परेड घेतली. पुणे शहर गुन्हेगारीमुक्त करण्याचा आमचा उद्देश असून कायदा कुणी हातात घेऊ नये, ही सूचना सर्व गुंड आणि गुन्हेगारांना दिल्या आहेत.

यासोबतच काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता एकाच जागी जास्त काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. यासाठी काही अंतर्गत बदल्या केल्या जाणार असल्याचे अमितेशकुमार यांनी सांगितले आहे.

गुंडांच्या सोशल मिडियावरही नजर ठेवणार

पोलिस (Pune News) आता गुंडांच्या सोशल मिडियावरही नजर ठेवणार आहे. उगीच कुणी हीरो बनण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याची खैर नसणार आहे. पोलिस याकडे बारीक नजर ठेऊन असणार आहे. अमितेश कुमार यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ बघितला तर, त्यांनी अनेक मोठे निर्णय घेत गुन्हेगारी संपुष्टात आणली आहे. त्यामुळे पुण्यातील ही दादागिरीही लवकरच मोडीत निघणार असे आता म्हटले जात आहे.

News Title- Pune News Criminal Intelligence Unit will be set up in pune

महत्त्वाच्या बातम्या –

“लोक फक्त यश मिळाल्यावर आपल्यासोबत असतात पण…”, बुमराहनं व्यक्ती केली खदखद

बेरोजगारीवरून काँग्रेसची टीका; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट आकडेवारीच सांगितली!

आज मी आणखीच श्रीमंत झालो; 12th नापास IPS अधिकाऱ्याच्या भेटीने आनंद महिंद्रा भारावले

पूनम पांडेवर सरकार मोठी जबाबदारी सोपवणार? आरोग्य मंत्रालयाने दिली अपडेट

पंतप्रधान मोदींचे एक भाषण आणि सरकारी शेअर्स सुसाट; 24 लाख कोटींची कमाई