मोठी गुड न्यूज! ‘या’ आठवड्यात स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sovereign Gold Bonds | भारतीयांना सोने खरेदी करण्याची आणि सोने परिधान करण्याची प्रचंड हौस असते. सोन्याची दागिने तर महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. आता तुम्हाला स्वस्त सोने खरेदी (Sovereign Gold Bonds) करण्याची मोठी संधी मिळणार आहे. तुम्हाला जर सरकारी गोल्ड बॉन्ड  खरेदी करायचा असेल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती असणार आहे.

पुढच्या आठवड्यात तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2023-24 सिरिज IV 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 दरम्यान 5 दिवसांसाठी खुलणार आहे. या संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकता. याबाबत अर्थ मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.

Sovereign Gold Bonds कुठे मिळणार?

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या या निवेदनानुसार, SGB (Sovereign Gold Bonds) ला कमर्शियल बँका (स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता), स्टॉकहोल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजद्वारे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड मार्फत विकले जाणार आहे.

सर्वसाधारणपणे, सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये 1 ग्रॅम सोन्याची किंमत बाजारभावापेक्षा कमी असते. त्यामुळे याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. ही संधी आता पुढच्या आठवड्यात मिळणार आहे.

Sovereign Gold Bonds कोण खरेदी करू शकतात?

भारतीय नागरिक आणि भारतात राहणारे भारतीय मूळ व्यक्ती (PIOs)
हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF)याची खरेदी करू शकतात.
ट्रस्ट: भारतातील नोंदणीकृत सार्वजनिक आणि खाजगी ट्रस्ट
विद्यापीठे: भारतातील विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे मान्यताप्राप्त सर्व विद्यापीठे.
धर्मादाय संस्था: आयकर कायदा 1961 अंतर्गत नोंदणीकृत संस्था हा सॉवरेन गोल्ड बाँड खरेदी करू शकतात.

‘यांना’ मिळणार नाही फायदा

अनिवासी भारतीय (NRI): यांना SGB मध्ये थेट गुंतवणूक करण्याची परवानगी नाही.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII): SGB मध्ये गुंतवणूक करण्यासाठी FIIलाही परवानगी नाही.
अल्पवयीन: SGB (Sovereign Gold Bonds)मध्ये त्यांच्या गुंतवणुकीसाठी अल्पवयीन यांना परवानगी नाही.

Sovereign Gold Bonds साठी अर्ज कसा करणार?

तुमच्या इंटरनेट बँकिंग खात्यात लॉग इन करा.
मुख्य मेनूवर जाऊन ‘ई-सेवा’ निवडा आणि ‘सॉवरेन गोल्ड बॉन्ड’ वर क्लिक करा.
तुम्ही नवीन ग्राहक असल्यास, ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा.पुढे जाण्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सेट केलेल्या अटी व शर्ती वाचा आणि स्वीकारा.
SGB ​​योजनेशी संबंधित सर्व आवश्यक तपशील एंटर करा आणि तुमच्या डिमॅट खात्यावर अवलंबून CDSL किंवा NSDL कडून ठेव भागीदाराबद्दल माहिती द्या.
ऑनलाइन नोंदणी फॉर्म सबमिट करा.
नोंदणीनंतर हेडर लिंक/विभागातून खरेदी पर्याय निवडा किंवा थेट ‘खरेदी’ वर क्लिक करा.
सदस्यता प्रमाण आणि नामनिर्देशित माहिती भरा
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP एंटर करा.

News Title :  Sovereign Gold Bonds subscription will start next week
महत्त्वाच्या बातम्या-

HDFC चा ग्राहकांना सर्वात मोठा झटका!

आता गुन्हेगारांना सुट्टी नाहीच…, पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांनी घेतला धडाकेबाज निर्णय!

“तेव्हाच लोक आपल्यासोबत असतात…”, बुमराहनं व्यक्ती केली खदखद

बेरोजगारीवरून काँग्रेसची टीका; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट आकडेवारीच सांगितली!

आज मी आणखीच श्रीमंत झालो; 12th नापास IPS अधिकाऱ्याच्या भेटीने आनंद महिंद्रा भारावले