Post Office Scheme | भारतीय पोस्ट ऑफिस नेहमीच आकर्षक व्याजदरासह नवीन-नवीन स्कीम आणत असते. आता अशीच एक नवीन स्कीम पोस्ट ऑफिसने आणली आहे. या स्कीममध्ये (Post Office Scheme) तुम्हाला व्याजातूनच मोठा लाभ मिळणार आहे. यासोबतच तुम्हाला करामध्येही मोठा फायदा मिळणार आहे.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते (Post Office Time Deposit Account) असे आहे. यामध्ये गुंतवणूकदार 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो. नवीन आकडेवारीनुसार 1 जानेवारी 2024 पर्यंत याचे व्याजदर 6.9%, 7.0%, 7.1% आणि 7.5% असे आहेत.
किती वर्षांची गुंतवणूक करावी लागणार?
पोस्टाचा (Post Office Scheme ) हा व्याजदर 31 मार्चपर्यंत लागू राहणार आहे. दर तीन महिन्यांनी याचे व्याज सुधारित केले जाते. व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते. त्यामुळे तुम्हाला किती वर्षांची गुंतवणूक करायची यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. या योजने अंतर्गत जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांसाठी पैसे गुंतवले तर 7.5 टक्क्यांच्या आधारे पाच वर्षात एकूण व्याजाची रक्कम सुमारे 2.25 लाख रुपये होते.
तुम्ही याला पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना देखील म्हणू शकता. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर, 5 लाख रुपयांची मूळ रक्कमही तुम्हाला परत केली जाईल. यासोबतच व्याजाची रक्कम सुमारे 2.25 लाख रुपयेही तुम्हाला मिळतील. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे.
योजनेवर कर लाभही मिळणार
इंडिया पोस्टच्या वेबसाइटवर (Post Office Scheme )या योजनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही किमान 1000 रुपये या योजनेत जमा करू शकता. यात तुम्ही कितीही वेळा डिपॉजिट खाते उघडू शकता. याचे व्याज तुम्हाला दरवर्षी दिले जाईल. मात्र, ड्यू डेट नंतर तुम्हाला तुमच्या व्याजाच्या रकमेवर कोणताही अतिरिक्त लाभ मिळणार नाही.
तुम्हाला या योजनेत कलम 80 सी अंतर्गत 5 वर्षांच्या योजनेवर कर लाभही मिळेल. खाते उघडल्यानंतर किमान सहा महिन्यांनंतरच तुम्हाला ते बंद करता येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पोस्टात खाते उघडू शकता.
News Title: Post Office Scheme Time Deposit Account
महत्त्वाच्या बातम्या-
आता गुन्हेगारांना सुट्टी नाहीच…, पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांनी घेतला धडाकेबाज निर्णय!
“तेव्हाच लोक आपल्यासोबत असतात…”, बुमराहनं व्यक्ती केली खदखद
बेरोजगारीवरून काँग्रेसची टीका; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट आकडेवारीच सांगितली!
आज मी आणखीच श्रीमंत झालो; 12th नापास IPS अधिकाऱ्याच्या भेटीने आनंद महिंद्रा भारावले
पूनम पांडेवर सरकार मोठी जबाबदारी सोपवणार? आरोग्य मंत्रालयाने दिली अपडेट