प्रेपोज डे शायरी 2024: प्रिय व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी रोमँटिक शायरी आणि कविता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Propose Day | व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. कपल्स हा वीक मोठ्या उत्साहने साजरा करतात. व्हेलेंटाईन (Valentine Week) वीकची सुरवात रोज डेने सुरु होते. त्यानंतर येणारा दिवस म्हणजेच प्रपोज डे (Propose Day Message). या वेळी अनेक जण आपल्या आवडत्या व्यक्तींना प्रपोज करतात. प्रपोज डे हा त्या लोकांसाठी असतो, ज्यांना आपल्या आवडत्या व्यक्तीला त्यांच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करायचं असतं. या दिवशी प्रेम व्यक्त करण्यासाठी एक उत्तम संधी असते.

कसं प्रपोज करणार?

जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर तुम्ही त्याला तुमच्या मनातलं सांगा. वेळ वाया न घालवता ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता त्याला प्रपोज करा. आपलं प्रेम व्यक्त करा, नाहीतर संधी आणि वेळ संपल्यावर रिकाम्या हाती परतावं लागेल.

कुणास ठाऊक, यावेळी प्रपोज डे (Propose Day Whats-app Status) च्या दिवशी समोरची व्यक्ती तुमचं प्रेम स्वीकारून तुम्हाला आपल्या हृदयात जागा देईल. मात्र तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीच्या जर समोरा समोर बोलण्यासाठी भीत असाल, किंवा तुमची आवडती व्यक्ती तुमच्यापासून लांब असेल आणि तुम्हाला तिला प्रपोज करायचं असेल तर तुम्ही त्यांना मेसेज द्वारे प्रपोज करु शकता. या मध्ये तुम्ही प्रेम कविता, शायरीचा सुद्धा वापर करु शक्ता.

प्रेम कविता-

  • आठवते पहिली भेट, कोवळा सूर्यकिरण तुझ्या चेहऱ्यावर उमटला होता,

 हसण्यातली चंचलपणा आणि डोळ्यांतली खळखळ, माझं मन गवसला होता.

वाऱ्यासारखं तुझ्या संगतीनं मिटवले मी मजवरील धुळ, फुलांच्या सुगंधासारखं भरला जीव तुझ्या प्रेमाच्या गंधानं.

आज प्रपोज डेचा दिवस साक्षी आहे, बोलून टाकावे लागले आहे.

हात मिळवून सांगेन, तुझ्याशिवाय माझं जग अपूर्ण आहे.

जन्मभर साथ द्यायला तयार आहेस का?

हा प्रश्न काळजाचा ठोठा आहे, पण उत्तर ऐकण्याची आस धरतो आहे.

Happy Propose Day ! (Propose Day Message)

  • नाही आज पर्यंत बोलता आले,

आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…

नाही जगू शकत तुझ्याशिवाय,

इतकेच तुला सांगणार आहे…

Happy Propose Day !

  • Dear,

होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव,

बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवट पर्यंत करेन…

Happy Propose Day !

  • ओढ लागलीया तुला मिळवायची,

तु मला समजुन घेशील का..?

लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं, प्रेम तुझं देशील का..?

थांबव आता खेळ हा स्वप्नांचा, कायमची माझी होशील का..?

Happy Propose Day !

  • हृदयाच्या जवळ राहणारं, कुणीतरी असावे,

असं तुला वाटत नाही का?

मी तर तुलाच निवडलं, तू मला निवडशील का…?

Happy Propose Day !

  • एक होकार हवा बाकी काही नको,

बाकी काही नको फक्त नाही म्हणू नको

Happy Propose Day !

News Title : message for propose day

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ योजनेमुळे 20 व्या वर्षी तुमची लेक होईल 70 लाखांची मालकीण, आताच सुरू करा गुंतवणूक

काँग्रेसला सर्वात मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर अत्यंत गंभीर आरोप, प्रकरण न्यायालयात गेलं

“…म्हणून मी सुशांतबद्दल बोलायचे”; Ankita Lokhande नं स्पष्टच सांगितलं

HDFC चा ग्राहकांना सर्वात मोठा झटका!