काँग्रेसला सर्वात मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये (Congress) असलेले मुंबईतील बडे नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. मिलिंद देवरा हे काँग्रेस सोडून शिंदे गटात जातील, असं कुणाला वाटलं नव्हतं. आता काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का

काँग्रेसचे (Congress) मुंबईतील ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडली आहे. ते अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होणार आहे.  अखेर बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

बाबा सिद्दीकींचा राजीनामा

मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झालो. गेल्या 48 वर्षांचा काँग्रेस सोबतचा माझा महत्त्वाचा प्रवास राहिला आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला या प्रवासाबद्दल बोलायला खूप आवडले असते. पण म्हणतात ना काही गोष्टी न सांगितल्या बऱ्या. माझ्या या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो, असं बाबा सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.

बाबा सिद्दीकी तीन वेळा ते वांद्रा येथून आमदार राहिले आहेत. विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर मुंबई महापालिकेत नगरसेवक बनले. त्यानंतर 1999, 2004 आणि 2009 मध्ये वांद्रे मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलीये.

बाबा झियाउद्दीन सिद्दीकी त्यांच्या भव्य इफ्तार पार्ट्यांसाठी फेमस आहेत. ज्यात सलमान खान आणि शाहरुख खानसह सेलिब्रिटी उपस्थित असतात. बाबा सिद्दीकी हे प्रचंड इफ्तार पार्टी आणि चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगातील सर्वात मोठ्या स्टार्सना एकाच छताखाली आणण्यासाठी ओळखले जातात.

मिलिंद देवरा यांच्यानंतर बाबा सिद्दीकी हे पक्ष सोडणारे दुसरे मोठे काँग्रेस नेते ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील माजी आमदार बाबा सिद्दीकी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात, अशी बातमी समोर आली होती. अखेर त्यांनी आज राजीनामा दिला.

महत्त्वाच्या बातम्या- 

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर अत्यंत गंभीर आरोप, प्रकरण न्यायालयात गेलं

“…म्हणून मी सुशांतबद्दल बोलायचे”; Ankita Lokhande नं स्पष्टच सांगितलं

HDFC चा ग्राहकांना सर्वात मोठा झटका!

आता गुन्हेगारांना सुट्टी नाहीच…, पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांनी घेतला धडाकेबाज निर्णय!

“तेव्हाच लोक आपल्यासोबत असतात…”, बुमराहनं व्यक्ती केली खदखद