Ankita Lokhande | ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांना प्रसिद्धी मिळाली. याच मालिकेदरम्यान त्यांच्यात प्रेमाचे संबंध तयार झाले होते. मात्र काही वर्षांनी त्यांच्यात काही कारणाने वाद झाल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सुशांतच्या निधनानंतर अंकिताने विकी जैनसोबत लग्न करत संसार थाटला. पण ती अजूनही सुशांतच्या आठवणी व्यक्त करत असते.
अंकिता आणि तिचा पती विकी जैन यांनी ‘बिग बॉस 17’ मध्ये सहभाग नोंदवला होता. या शोमध्ये अंकिता आणि विकित बऱ्याचदा सुशांतमुळे वाद झाले. कारण अंकिता सतत सुशांतचा उल्लेख करत त्याचं कौतुक करत असत. तिचं हे बोलणं विकीच्या आईला खूप खटकायचं
अंकिता सुशांतचा उल्लेख करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असते, असा आरोप विकी जैनची आई रंजना जैन यांनी केला होता. यामुळे त्यांच्या कुटुंबात अनेक वाद-विवादही झाले होते. विकीच्या आईने नॅशनल टीव्हीवर येत सर्वांसमोर अंकितावर अनेक आरोप केले होते. आता हा शो संपला आहे. अंकिताने या सर्व प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.
“सुशांत आता या जगात नाही, पण..”
“मला कोणाच्याही फॅन फॉलोईंगची गरज नाही. मला कोणाबद्दल बोलण्यासाठी कोणाकडूनही परवानगी घ्यायची गरज नाही. जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात खरंच काही चांगल्या गोष्टी केल्या असतील, तर मी नक्कीच त्यावर बोलेल. कारण, ते माझ्या आयुष्याचा भाग आहेत.”, असे अंकिता म्हणाली आहे. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने (Ankita Lokhande) यावर भाष्य केले आहे.
“मी सुशांतबद्दल नेहमी चांगलं बोलत असते. कारण जर माझ्यासमोर एखादा मुलगा बसला असेल आणि त्याच्यासाठी सुशांत प्रेरणास्थान असेल तर मी त्याला त्याच्याबद्दल चांगलेच सांगणार. मी त्याला प्रोत्साहित करणार. सुशांत आता या जगात नाही. पण, त्याने केलेल्या चांगल्या गोष्टी मला स्मरणात आहेत.त्यावर मी बोलणार, माझ्या नवऱ्यालाही त्याबाबत काहीच हरकत नाही.”, असेही अंकिता म्हणाली आहे.
तुमच्या भावनांवर आणि प्रतिक्रियांवर तुमचं नियंत्रण असायला हवं. तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये अती भावूक होऊ नये, कारण ते तुमच्यासाठीच घातक ठरते. त्यामुळे अती भावुक किंवा अती व्यक्त होऊ नये, या गोष्टी मला बिग बॉसमध्ये शिकायला मिळाल्या, असे अंकिता म्हणाली. बिग बॉस च्या घरात अंकिता (Ankita Lokhande) आणि विकी यांच्यात खूप भांडण दिसून आली होती. मात्र, त्यातून बाहेर पडताच दोघे पुन्हा गुण्यागोविंदाने राहताना दिसूनआले.
News Title- Ankita Lokhande revelation about Sushant Singh
महत्त्वाच्या बातम्या –
“लोक फक्त यश मिळाल्यावर आपल्यासोबत असतात पण…”, बुमराहनं व्यक्ती केली खदखद
बेरोजगारीवरून काँग्रेसची टीका; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट आकडेवारीच सांगितली!
आज मी आणखीच श्रीमंत झालो; 12th नापास IPS अधिकाऱ्याच्या भेटीने आनंद महिंद्रा भारावले
पूनम पांडेवर सरकार मोठी जबाबदारी सोपवणार? आरोग्य मंत्रालयाने दिली अपडेट
पंतप्रधान मोदींचे एक भाषण आणि सरकारी शेअर्स सुसाट; 24 लाख कोटींची कमाई