राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather update | जानेवारीच्या सुरूवातीला प्रचंड थंडी पडली होती. मधे ही थंडी कमी झाली होती. आता पुन्हा एकदा थंड वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील काही भागांत पावसाची (Weather update) शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा ओघ कमी झाल्यामुळे आठवड्यापुर्वी उष्णता जाणवत होती. त्याचवेळी विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भारताच्या उत्तर भारतात यावर्षी प्रचंड थंडी पडली होती. या थंडीमुळे हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली होती. परिणामी, बऱ्याच जणांना आपला जीवही गमवावा लागला. पाळीव प्राणीदेखील या थंडीमुळे दगावले. या थंडीचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवला आहे.

राज्यात पावसाची शक्यता

राज्यात थंड वाऱ्यामुळे (Weather update) रात्री आणि पहाटेच्या सुमारास हलका गारवा जाणवत आहे. किमान तापमानसह कमाल तापमानातसुद्धा वाढ होत आहे. यामुळे दिवसा उन्हाचे हलके चटके जाणवू लागले आहेत. या बदलणाऱ्या हवामानामुळे आरोग्याच्याही अनेक समस्या निर्माण होत आहेत.

हवामान विभागाने आजपासून (8 फेब्रुवारी) महाराष्ट्रासह इतरही काही राज्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह शुक्रवारी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाऊस पडला तर पुन्हा थंड वारे वाहू शकतात.

देशातील ‘या’ भागांत पावसाची शक्यता

हवामान विभागाने आजपासून (Weather update) अरुणाचल प्रदेशसह पश्चिम बंगाल, नागालँड, मेघालय, आसाम,त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर याठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारतात पावसाची शक्यता देण्यात आली आहे. तसेच, पूर्व विदर्भ ते तेलंगणा, कर्नाटक पर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातही पाऊस पडू शकतो.

News Title : Weather update rain forecast in state

महत्त्वाच्या बातम्या-

HDFC चा ग्राहकांना सर्वात मोठा झटका!

आता गुन्हेगारांना सुट्टी नाहीच…, पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांनी घेतला धडाकेबाज निर्णय!

“तेव्हाच लोक आपल्यासोबत असतात…”, बुमराहनं व्यक्ती केली खदखद

बेरोजगारीवरून काँग्रेसची टीका; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट आकडेवारीच सांगितली!

आज मी आणखीच श्रीमंत झालो; 12th नापास IPS अधिकाऱ्याच्या भेटीने आनंद महिंद्रा भारावले