गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य!, संजय राऊतांनी टाकलेल्या नव्या फोटोमुळे राज्यात खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde |  गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) राज्यातील काही कुख्यात गुन्हेगारांचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक होताना दिसत आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे गुन्हेगारांचे फोटो ट्विट करत शेअर केले आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा, असा टोला देखील लगावला आहे.

ट्विट केलेल्या फोटोमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्याच्या शेजारी एक इसम आहे. त्या दोघांनीही गळ्यामध्ये शिवसेनेचे उपरणे घातले आहे. त्यातील त्या इसमाच्या भोवती रिंगण करण्यात आलं असून संजय राऊत असे रोज फोटो शेअर करत आहेत. राऊतांनी तो इसम गुन्हेगार असल्याचा दावा केला आहे.

काय आहे ट्विट?

“शिंदे गँग च्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा.. ठाणे पुणे परिसरात हत्या, अपहरण, सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे.. अशा गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत! पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या दाखलेबाज महात्म्याची माहिती जाहीर करावी! गुंडांनी गुंडासाठी चालवलेले राज्य!” असं संजय राऊत ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

राऊतांचं फोटोवॉर सुरूच

संजय राऊत यांनी गेल्या चार दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांचे गुन्हेगारांसोबतचे चार फोटो बाहेर काढले आहेत. पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसादिवशीच्या फोटोत गुन्हेगार हेमंत दाभेकर होता, हाच फोटो  संजय राऊत यांनी शेअर केला.

दुसऱ्या दिवशी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो राऊत यांनी ट्विट केला होता. निलेश घायवळवर पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यामध्ये 14 हून अधिक आरोप आहेत.

तिसरा फोटो राऊत यांनी 8 फेब्रुवारीला शेअर केला आहे. यामध्ये दिसणारा व्यक्ती हा गुंड असल्याचा दावा राऊत यांनी केला. यावर अनेक आरोप आहेत. तो पुण्यातील गुन्हेगार असून त्याचं नाव जितेंद्र जंग आहे. त्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी असे अनेक आरोप आहेत. कसबा निवडणुकीला जितेंद्र जंगमनं शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता तेव्हाचा फोटो आहे.

 महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Axis बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

मोठी गुड न्यूज! ‘या’ आठवड्यात स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Post Office ची भन्नाट योजना; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई

प्रेपोज डे शायरी 2024: प्रिय व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी रोमँटिक शायरी आणि कविता