लोन घेणारांसाठी मोठी गुड न्यूज; RBI नं केली सर्वात मोठी घोषणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | तुम्ही जर होम लोन घेणार असाल तर तुमच्यासाठी एक मोठी गुडन्यूज समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एमपीसी निकाल जाहीर करताना रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर जुन्या पातळीवरच राहिल्याने गृहकर्जाच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही. ही सलग सहावी वेळ आहे जेव्हा रेपो दर जुन्या पातळीवरच राहिला आहे. बँकेने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दर 6.5 टक्क्यांपर्यंत वाढवला होता.

RBI नं केली सर्वात मोठी घोषणा

केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीने पुन्हा एकदा धोरणात्मक व्याजदर – रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. सलग सहाव्यांदा रेपो दर 6. 5% वर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्राहक कर्ज घेण्यासाठी जातात तेव्हा त्यांना सुरुवातीला कागदपत्रे, प्रक्रिया आणि इतर शुल्क भरावे लागतात. त्यामुळे त्यांच्या कर्जावर होणारा खर्च वाढतो. आरबीआयने (RBI) आता बँकांना त्यांच्या व्याजदरात कर्जावरील इतर शुल्क समाविष्ट करण्यास सांगण्यात आलं आहे. जेणेकरून ग्राहकांना कळू शकेल की त्यांना त्यांच्या कर्जावर किती व्याज द्यावं लागेल.

RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आपल्या अभिभाषणात सांगितलं की, जागतिक आर्थिक परिस्थितीतून केवळ संमिश्र संकेत मिळत आहेत. अस्थिर जागतिक परिस्थितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केली आहे. महागाईही कमी होताना दिसत आहे. यावेळी बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

रेपो रेट म्हणजे काय?

ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गरजांसाठी बँकांकडून कर्ज घेता, त्याचप्रमाणे सार्वजनिक आणि व्यावसायिक बँकाही त्यांच्या गरजा भागवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात.

जसं तुम्ही कर्जावर व्याज भरता तसं बँकांनाही व्याज द्यावं लागतं. म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या व्याजदराने बँकांना कर्ज देते त्याला रेपो दर म्हणतात. रेपो दर कमी म्हणजे बँकांना स्वस्त कर्ज मिळेल. बँकांना स्वस्त कर्ज मिळालं तर त्या ग्राहकांनाही स्वस्त कर्ज देतील. म्हणजेच रेपो दर कमी झाल्यास त्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतो. रेपो दर वाढल्यास सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतात.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Axis बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

मोठी गुड न्यूज! ‘या’ आठवड्यात स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Post Office ची भन्नाट योजना; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई

प्रेपोज डे शायरी 2024: प्रिय व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी रोमँटिक शायरी आणि कविता