काय आहे मोदी सरकारची लखपती दीदी योजना?; महिलांसाठी फायदाच फायदा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lakhpati Didi Yojana | भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मोठ्या योजना आखल्या असल्याचं सांगितलं. सरकारच्या ‘लखपती दीदी योजना’ (Lakhpati Didi Yojana) ला पुढाकार देण्याचं उद्दिष्टय असल्याचं त्यांनी सांगितलं.

मोदी सरकारने लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट आता 2 कोटींवरून 3 कोटी रुपये केल्याचं म्हटलं आहे. आता ही लखपती दीदी योजना काय आहे आणि तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता ते तुम्हाला इथे कळणार आहे. या योजनेसाठी कसा अर्ज करावा, याचा किती लाभ होईल याची सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे.

लखपती दीदी योजना नेमकी काय आहे?

लखपती दीदी योजना (Lakhpati Didi Yojana) हा मोदी सरकारचा एक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आहे. या योजनेत सरकार महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन पैसे कमवण्यासाठी सक्षम बनवतं. यामुळे महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मोठी मदत मिळते. या योजनेअंतर्गत महिलांना एलईडी बल्ब बनवणे, एलईडी बल्ब बनवणे आणि इतर अनेक कामांचे प्रशिक्षण दिले जाते. ही योजना बचत गटांच्या माध्यमातून चालवली जाते.

Lakhpati Didi Yojana चे फायदे

सरकारच्या या लखपती दीदी योजनेत व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना मार्गदर्शन दिले जाते.
यासोबतच ट्रेडिंग स्ट्रॅटेजी विकसित करण्यात आणि मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी मदत केली जाते.
लखपती दीदी योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून कर्ज दिले जाते.
महिलांना बचतीसाठी प्रोत्साहन दिले जाते.
ही योजना कमी खर्चात विमा संरक्षणाची सुविधा देखील देते.

लखपती दीदी योजनाचा लाभ कसा घेणार?

लखपती दीदी योजनेचा (Lakhpati Didi Yojana) लाभ भारतातील कोणतीही महिला घेऊ शकते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील मूळ रहिवासी असणे आणि कोणत्याही बचत गटात सामील होणे अनिवार्य आहे.
यासाठी तुमच्या भागातील बचत गट कार्यालयात जाऊन तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल आवश्यक कागदपत्रे सबमिट करणे बंधनकारक आहे.
यानंतर तुमचा अर्ज पुनरावलोकनानंतर मंजूर केला जाईल. त्यानंतर कर्जासाठी तुमच्याशी संपर्क साधला जाईल.

Lakhpati Didi Yojana योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र
बँक पासबुक
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
पासपोर्ट आकाराचा फोटो ही सर्व कागदपत्रे या योजनेत अर्ज करण्यासाठी लागतात.

News Title-  Lakhpati Didi Yojana applying Information
महत्त्वाच्या बातम्या –

HDFC चा ग्राहकांना सर्वात मोठा झटका!

आता गुन्हेगारांना सुट्टी नाहीच…, पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांनी घेतला धडाकेबाज निर्णय!

“तेव्हाच लोक आपल्यासोबत असतात…”, बुमराहनं व्यक्ती केली खदखद

बेरोजगारीवरून काँग्रेसची टीका; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट आकडेवारीच सांगितली!

आज मी आणखीच श्रीमंत झालो; 12th नापास IPS अधिकाऱ्याच्या भेटीने आनंद महिंद्रा भारावले