मोठी बातमी! विकी कौशलचा अपघात, प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vicky Kaushal | बाॅलिवूड अभिनेता विकी कौशल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. विकीच्या सॅम बहादुर या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला आणि विकी कौशलच्या भूमीकेला प्रेक्षकांनी सुद्धा मनापासून पसंती दिली होती. विकी आपल्या प्रोफेशनल लाईफ बरोबरच पर्सनल लाईफमध्ये सुद्धा चर्चेत असतो. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी तो कायम नवनवीन फोटो व्हिडीओ शेअर करत असतो. कधी कधी तो पत्नी कतरिना कैफ बरोबरचे सुद्धा फोटो पोस्ट करतो. दरम्यान एका शूटिंगमध्ये विकी कौशल दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं?

विकी एका चित्रपटाचं शूटिंग करत आहे. दरम्यान या वेळी शूटिंग सुरु असताना विकीला (Vicky Kaushal) सेटवरच दुखापत झाली आहे. या वेळेस विकी काैशलच्या हाताला मार लागल्याने त्याच्या हाताला प्लास्टर करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर विकीच्या हाताला प्लास्टर लावल्याचा फोटो व्हायरल होत आहे. सेटवर आपघात झाल्यानंतर त्याला लगेगच डाॅक्टरांकडे नेण्यात आलं. या वेळी डाॅक्टरांनी त्याला पुढील काही दिवस आराम करावं लागणार असल्याचं सांगितलं.

फोटो होतोय व्हायरल-

शूटिंगमध्ये विकीच्या हाथाला मार लागल्याची माहिती समोर आली. मात्र, याबाबत विकीने कोणतेही अपडेट शेअर केलेलं नाहीये. मात्र व्हायरल होणारे फोटो पाहून दिसत आहे की, विकीला मोठी दुखापत झाली आहे. विकी काैशलला ही दुखापत छावा चित्रपटाच्या सेटवर झाली आहे. एक अॅक्शन सीन शूट करताना विकी काैशलला ही दुखापत झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, विकी काैशलला दुखापत झाल्याने आता चित्रपटाची शूटिंग काही दिवसांसाठी थांबवण्यात आलेली आहे. डाॅक्टरांनी विकी काैशल याला पुढील काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिल्याचं सांगितलं जात आहे.

विकीच्या हाथाला प्लास्टर-

‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमानंतर विकी कौशलने पुन्हा लक्ष्मण उतेकरसोबत काम केले आहे. दुर्दैवाने याच सेटवर तो जखमी झाला आहे. विकी पुढील काही आठवडे आराम करणार असल्याचं बोललं जात आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर तो पुन्हा एकदा शूटींग सुरु करेन. विकीचा जखमी अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते चिंतेत पडले आहेत. सोशल मीडियावरुन चाहते विकीचा व्हिडीओ पाहून चिंता व्यक्त करत आहेत.

News Title : vicky kaushal get injured in shooting

महत्त्वाच्या बातम्या-

लोन घेणारांसाठी मोठी गुड न्यूज; RBI नं केली सर्वात मोठी घोषणा!

गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य!, संजय राऊतांनी टाकलेल्या नव्या फोटोमुळे राज्यात खळबळ

राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Axis बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

मोठी गुड न्यूज! ‘या’ आठवड्यात स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी