शेतकरी पेन्शन योजनेची घोषणा, शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3 हजार रुपये!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Government Scheme | मोदी सरकार आल्यापासून देशातील शेतकऱ्यांना अनेक योजनांचा (Government Scheme) लाभ मिळतोय. योजनांच्या अधारे अनुदान मिळतंय. तर काही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाते. अशीच एक योजना आता उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. 60 वयोगटाहून अधिक असणाऱ्या वृद्ध शेतकऱ्यांना प्रतिमहा 3000 रूपये देण्यात येणार आहे.

काय आहे योजना? 

उत्तर प्रदेशचे कृषीअधिकरी तेग बहादूर सिंग यांनी या योजनेविषयी माहिती दिली असून शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. किसान मानधन योजना, असं या योजनचं नाव असून या योजनेस शेतकरी पेन्शन योजना असं म्हटलं जातं. या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना अर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच 60 वयोगटातील शेतकऱ्यांना निश्चित वेतन दिलं जाणार आहे. यासाठी लाभार्थ्यांचं वय हे 18 ते 40 वर्षे असावं.

‘या’ लाभार्थ्यांना मिळणार लाभ 

या याजनेसाठी लाभार्थ्याचे वय हे 18 ते 40 वर्षे असावं.

दोन हेक्टर आणि त्यापेक्षा कमी असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

लाभार्थ्याच्या पत्नी/ पतीचा मृत्यू झाल्यास प्रतिमहा 1500 रूपये लाभ दिला जाईल.

दरमहा प्रीमियम भरणाऱ्यास या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

प्रीमियम भरणाऱ्यास योजनेचा लाभ

या याजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रीमियम भरणं गरजेचं आहे. यासाठी प्रीमियम हा वयानुसार वेगवेगळा आहे. 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना प्रीमियम हा 55 रुपये आहे. तर 40 वयोगटातील लाभार्थ्यांना 200 रूपये प्रीमियम आहे. 60 वय पूर्ण झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी बँक खाते असणं गरजेचं आहे, मात्र हे बँक खाते आधारकार्ड आणि पॅनकार्डशी जोडलेलं असावं.

तीन योजनांची अंमलबजावणी

योगी सरकारने मुख्य इतर तीन कृषी योजना तयार केल्या आहेत. मुख्यमंत्री फार्म सुरक्षा योजना, राज्य कृषी योजना आणि तिसरी म्हणजे यूपी कृषी सुरक्षा योजना या तीन योजनांची अंमलबजावणी योगी सरकारने केली आहे.

‘या’ योजनांसाठी कोट्यवधींची तरतूद

या तीन योजनांसाठी 460 कोटी खर्च करण्यात येणार आहे. राज्य कृषी योजनेसाठी 400 कोटी रूपये खर्च करण्यात आले. यूपी कृषी सुरक्षा योजनेसाठी 400 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फार्म सुरक्षा योजनेसाठी 50 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

News Title – Government Scheme For indian Farmers

महत्त्वाच्या बातम्या

लोन घेणारांसाठी मोठी गुड न्यूज; RBI नं केली सर्वात मोठी घोषणा!

गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य!, संजय राऊतांनी टाकलेल्या नव्या फोटोमुळे राज्यात खळबळ

राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Axis बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

मोठी गुड न्यूज! ‘या’ आठवड्यात स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी