साड्यांचे वाटप, लाईट्स गेले मग घोसाळकरांची हत्या; नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Abhishek Ghosalkar | गुरूवारी दहिसरमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने परिसरात एकच खळबळ माजली. अभिषेक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक होते. फेसबुक लाईव्हवर घोसाळकर यांची मुलाखत घेतल्यानंतर आरोपी स्वयंघोषित नेता आणि स्थानिक गुंड म्हणून प्रसिद्ध असलेल्या मॉरिस नरोनाने गोळीबार केला. खरं तर मुलाखत संपली असली तरी लाईव्ह वेबकास्ट सुरूच असल्याने घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला.

मॉरिसने घोसाळकरांवर पाच गोळ्या झाडल्या त्यानंतर त्याने स्वत:वर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली. लक्षणीय बाब म्हणजे हा सर्व प्रकार मॉरिस भाईच्या कार्यालयात घडला. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी महिलेने याबाबत सविस्तर सांगितले. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना महिलेने सांगितले की, साड्या वाटपाचा कार्यक्रम होणार असल्याचे आम्हाला दुपारी 3 वाजता फोन करून सांगण्यात आले.

प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितली घटना

प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले की, मॉरिसच्या कार्यालयामध्ये काही महिलांना बोलावण्यात आले होते, ज्यामध्ये मी देखील होते. दुपारी 3 वाजता ऑफिसमध्ये या असा फोन सर्व महिलांना आला होता. गणपत पाटील नगर येथील शिवसेनेच्या ऑफिसमध्ये महिला जमल्या. परंतु, अचानक फोन आला आणि कशासाठी बोलावले असावे असा विचार आमच्या मनात होता. दोन तास तिथे बसल्यानंतर आयसी कॉलनीच्या शाखेत येण्यास सांगितले. तिथे देखील दीड तास प्रतीक्षा करावी लागली. मग आम्हाला समजले की, मॉरिसकडून साड्या वाटपाचा कार्यक्रम केला जाणार आहे. पण, अचानक तिथे 2 मिनिटांसाठी लाईट्स गेल्या. आम्ही तेव्हा शाखेत बसलो होतो, तर मॉरिस शाखेच्या बाहेर दरवाजासमोर उभा होता. तितक्यात मॉरिसने माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना फोन करून त्याच्या ऑफिसमध्ये बोलावले.

“शिवेसेनेची शाखा आणि मॉरिसचे ऑफिस याच्यात फार अंतर नाही. घोसाळकर तेव्हा शाखेतच होते. ते लवकर न आल्याने पुन्हा एकदा मॉरिसने फोन करून त्यांना लवकर या मुलाखत घ्यायची आहे ऑफिसला या असे सांगितले. मग घोसाळकर हे प्रवीण नावाच्या कार्यकर्त्यासोबत मॉरिसच्या ऑफिसमध्ये गेले. प्रवीणने कशासाठी जात आहोत अशी विचारणा केली पण घोसाळकरांनी उत्तर देणे टाळले. आम्ही बाहेर होतो आणि घोसाळकर आणि प्रवीण मॉरिसच्या ऑफिसमध्ये गेले”, असे महिलेने सांगितले.

Abhishek Ghosalkar यांच्या हत्येचा थरार

तसेच घोसाळकर ऑफिसमध्ये गेल्यानंतर काहीच वेळात प्रवीण घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आला आणि ‘भाईला (अभिषेक घोसाळकर) गोळ्या मारल्या’, असे सांगितले. गोळ्या मारल्याचे समजताच सर्व महिलांनी भीतीपोटी तिथून पळ काढला. घोसाळकरांना वाचवायला कोणीच पुढे येत नव्हते. प्रवीणने कसेबसे त्यांना बाहेर आणले. मग आम्ही त्यांना रिक्षापर्यंत नेले, मात्र एकही रिक्षाचालक रूग्णालयात जायला तयार झाला नाही. अखेर एका रिक्षा चालकाला तयार केले आणि करूणा रूग्णालय गाठले, असेही प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले.

दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर आम्हाला पुढे काय सुचत नव्हते. आधी रूग्णालयात न्या मग कोणी काय केले हे पाहा असे मी सांगत राहिले. या गडबडीत मॉरिस कुठे होता, तो कुठे पळाला याची कोणाला काहीच कल्पना नव्हती. त्या रस्त्याला अंधार असतो त्यामुळे काहीच दिसले नाही, असेही संबंधित महिलेने सांगितले. खरं तर मॉरिसने गोळ्या झाडल्यानंतर स्वत:वर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.

News Title- An eyewitness woman has detailed how Abhishek Ghosalkar was killed and what happened then

महत्त्वाच्या बातम्या –

“घोसाळकरांच्या हत्येची घटना धक्कादायक, पूर्वी अशा बातम्या फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशमधून यायच्या”

बांगलादेशमध्ये टीम इंडियावर दगडफेक! फायनलमध्ये गोंधळ, भारताचे विजेतेपद काढून घेतले

मी घरात देखील शॉर्ट्स घालू शकत नव्हते; घटस्फोट अन् ईशा देओलचे ‘ते’ विधान चर्चेत

“महाराष्ट्राचा बिहार झालाय”, ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची हत्या; राजकारण तापलं; फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

हल्द्वानी दंगल! मशिदीवर कारवाई अन् हिंसाचाराचा आगडोंब; राज्यात हाय अलर्ट, शहर राहणार बंद