“घोसाळकरांच्या हत्येची घटना धक्कादायक, पूर्वी अशा बातम्या फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशमधून यायच्या”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Abhishek Ghosalkar | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. दहिसर येथील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक घोसाळकर यांची गुरूवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांची हत्या स्वयंघोषित नेता आणि स्थानिक गुंड अशी ओळख असलेल्या मॉरिस नरोनाने केली. हत्येनंतर आरोपीने देखील स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

अभिषेक घोसाळकर यांना गोळीबारानंतर जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली. या हत्येच्या घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

राज्यातील राजकारण तापलं

ते म्हणाले की, फेसबुक लाईव्हवर एका लोकप्रतिनिधीवर गोळीबार होतो यापेक्षा राज्याचे दुसरे काय दुर्दैव असू शकते? शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना धक्कादायक असून राज्यातील एक नागरिक म्हणून प्रचंड चीड आणणारी घटना आहे. एका मागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतकं सगळं होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे.

Abhishek Ghosalkar यांची हत्या

तसेच अशा प्रकारच्या बातम्या यापूर्वी फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशमधून यायच्या. आज हे चित्र महाराष्ट्रातील जनता प्रत्यक्ष आपल्या राज्यात बघत आहे. राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुंडांना राजाश्रय देत आहेत, एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. राज्यात काय सुरू आहे याची जाणीव तरी सत्ताधाऱ्यांना आहे का?, अशा शब्दांत त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

 

कायद्याचा धाक संपला – दानवे

ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रश्न विचारला केला. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले, “अतिशय वाईट घटना… महाराष्ट्रातून कायद्याचा धाक संपला आहे, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या आहे. गुंडांना राजाश्रय मिळत असल्याने महाराष्ट्रात अशा घटना राजरोस होताना दिसत आहेत.

“ही घटना असो की नुकताच भाजप आमदाराने केलेला गोळीबार… राज्यातील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कॅमेऱ्यापुढे चिल्लर गुंडांची परेड दाखवायला ठीक आहे. कायदा वेशीवर टांगणाऱ्यांचा मंत्रालयात मुक्त संचार आहे. यांचे व यांना पोसणाऱ्यांची कॉलर कोण व कधी धरणार हा माझा सवाल आहे, तुम्हाला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सुद्धा”, असे दानवेंनी सांगितले.

News Title- Abhishek Ghosalkar, former corporator of Shiv Sena’s Thackeray faction, has been killed and opposition leader Vijay Wadettiwar has criticized the government
 महत्त्वाच्या बातम्या –

बांगलादेशमध्ये टीम इंडियावर दगडफेक! फायनलमध्ये गोंधळ, भारताचे विजेतेपद काढून घेतले

मी घरात देखील शॉर्ट्स घालू शकत नव्हते; घटस्फोट अन् ईशा देओलचे ‘ते’ विधान चर्चेत

“महाराष्ट्राचा बिहार झालाय”, ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची हत्या; राजकारण तापलं; फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

हल्द्वानी दंगल! मशिदीवर कारवाई अन् हिंसाचाराचा आगडोंब; राज्यात हाय अलर्ट, शहर राहणार बंद

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल; टीम इंडियाला सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावण्याची सुवर्णसंधी