“महाराष्ट्राचा बिहार झालाय”, ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची हत्या; राजकारण तापलं; फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

Abhishek Ghosalkar | गुरूवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. (Abhishek Ghosalkar News) स्वयंघोषित नेता आणि स्थानिक गुंड अशी ओळख असलेल्या मॉरिस नरोना याने फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत. मॉरिसने आपला वाद मिटला असे जाहीर करण्यासाठी घोसाळकरांना त्याच्या कार्यालयात बोलावले आणि फेसबुक लाईव्ह सुरू असताना पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

खरं तर घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने देखील स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. राजकीय वैमनस्यातून त्याने हे कृत्य केले असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेवरून राजकारण चांगलेच तापले असून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

माजी नगरसेवकाची हत्या

माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राचा बिहार झाला असल्याची बोचरी टीका केली. आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्राचा बिहार झाला, असे म्हणण्यात आता काहीच अर्थ उरला नाही. कारण महाराष्ट्राने बिहारला खूप मागे सोडले आहे. गुंडांनी जणू काही महाराष्ट्र आपल्या मुठीत बंदिस्त करून टाकला आहे. हतबल सरकार उघड्या डोळ्यांनी सारे काही पाहते आहे. पोलिसांची दहशतच संपली आहे. पोलीस दलात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. पोलिसांवर फक्त विरोधकांना संपवण्याची जबाबदारी आहे. कायदा आणि सुव्यवस्था गेली खड्ड्यात.

Abhishek Ghosalkar हत्येवरून राजकारण तापलं

तसेच दुर्देवं आहे, महाराष्ट्राचे… इतक्या घटना घडूनही सरकारला लाज कशी वाटत नाही. जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत आहे. जनतेमधील रोष वाढतोय. पण, लोकांचा जीव जाणे, याला सरकारच जबाबदार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे. परवा कल्याण, आज मुंबई… अजून काय माहित किती घटना घडणार आहेत? कधी पुणे, कधी ठाणे तर कधी मुंबईत खुनांचा थरार सुरूच आहे, अशा शब्दांत आव्हाडांनी राज्य सरकारचा समाचार घेतला.

घोसाळकर हत्येप्रकरणी आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, अभिषेक घोसाळकर ह्यांची निर्दयीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. घोसाळकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देव त्यांना ह्या प्रचंड दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो.

 

संजय राऊतांचा मुंख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

“महाराष्ट्रात गुंडा राज. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस नरोना चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता. मुख्यमंत्री त्याला भेटले. मॉरिस याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले. (वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय) आज त्याने अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला. फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी, राजीनामा द्या”, असे संजय राऊतांनी म्हटले. त्यांनी शिंदे आणि मॉरिसचा फोटो पोस्ट करत प्रश्न उपस्थित केले आहेत.

घोसाळकर हत्येप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, आम्हाला गोळीबाराची माहिती मिळाली आणि आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. दोन्ही जखमींना रुग्णालयात नेण्यात आले, पण दोघांचाही मृत्यू झाला आहे. घटनेची सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. पोलीस पुरावे गोळा करत आहेत.

News Title- Abhishek Ghosalkar, former Dahisar corporator of Shiv Sena UBT faction, was killed by Morris Narona and also committed suicide
महत्त्वाच्या बातम्या –

सर्वात मोठी बातमी; ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, मुंबई हादरली

शेतकरी पेन्शन योजनेची घोषणा, शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3 हजार रुपये!

कॉमेडियन कपिल शर्मा मोठ्या अडचणीत; थेट ईडीकडे केली तक्रार

महाराष्ट्रातील हवामानात बदल, ‘या’ भागात पावसाची शक्यता!

प्रसिद्ध अभिनेत्री Yami Gautam ने चाहत्यांना दिली मोठी गुड न्यूज!