हल्द्वानी दंगल! मशिदीवर कारवाई अन् हिंसाचाराचा आगडोंब; राज्यात हाय अलर्ट, शहर राहणार बंद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Haldwani Riots | उत्तराखंडमधील हल्द्वानी शहर आगीच्या हिंसाचाराने जळत आहे. गुरूवारी नैनिताल जिल्ह्यातील हल्द्वानी येथील बनभुलपुरा भागात बेकायदेशीरपणे बांधलेल्या मदरसा आणि नमाजच्या ठिकाणी बुलडोझरच्या कारवाईनंतर झालेल्या गोंधळात सुमारे 100 पोलीस जखमी झाले. मशिदीवर कारवाई करताच स्थानिकांनी रोष व्यक्त केला आणि हिंसाचाराची आग पेटली. खबरदारी म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

हिंसाचारानंतर जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये जवळपास 100 लोकांपैकी बहुतांश पोलीस कर्मचारी आणि पालिका कर्मचारी आहेत. दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोळी लागल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण उत्तराखंडमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मशिदीवर कारवाई अन् आगडोंब

कर्फ्यूमुळे शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठा बंद राहणार आहेत. हल्द्वानी येथील जिल्हाधिकारी वंदना सिंह यांनी सांगितले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. लोकांना शांततेचे आवाहन केले जात आहे. दिशाभूल करणारी माहिती न देण्याचे आव्हानही माध्यमांना करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवांसाठी नगर दंडाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल.

प्रकरणाचे गांभीर्य पाहून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राजधानी डेहराडूनमध्ये उच्चस्तरीय बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आणि अराजक घटकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. इंदिरा नगर भागात मलिकच्या बागेत उभारलेला बेकायदेशीर मदरशाची इमारत महापालिकेने जेसीबी मशिनच्या सहाय्याने जमीनदोस्त केली.

Haldwani Riots सरकारचे कारवाईचे आदेश

नमाजची जागा देखील नष्ट करण्यात आली आहे. सरकारच्या या कारवाईनंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मलिकच्या बागेभोवती हा मदरसा होता. इमारतीवर जेसीबी चालताच अनियंत्रित घटकांनी पोलीस आणि प्रशासनावर दगडफेक केली, ज्यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले.

 

हल्द्वानी येथे पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची आणि परिसरात अशांतता पसरवण्याची घटना गांभीर्याने घेत मुख्यमंत्र्यांनी शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या कडक सूचना दिल्या. डेहराडून येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव राधा रतुरी, पोलीस महासंचालक अभिनव कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

News Title- Due to the Haldwani Riots in Uttarakhand, the state is on high alert and a city shutdown has been announced
महत्त्वाच्या बातम्या –

सर्वात मोठी बातमी; ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, मुंबई हादरली

शेतकरी पेन्शन योजनेची घोषणा, शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3 हजार रुपये!

कॉमेडियन कपिल शर्मा मोठ्या अडचणीत; थेट ईडीकडे केली तक्रार

महाराष्ट्रातील हवामानात बदल, ‘या’ भागात पावसाची शक्यता!

प्रसिद्ध अभिनेत्री Yami Gautam ने चाहत्यांना दिली मोठी गुड न्यूज!