भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल; टीम इंडियाला सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावण्याची सुवर्णसंधी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

U19 World Cup 2024 | भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी विश्वचषकाच्या फायनलमध्ये भिडतील अशी चाहत्यांना आशा होती. मात्र ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करत अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तीन वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने अत्यंत रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा 1 गडी राखून पराभव केला. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर, भारताला जेतेपदाचा षटकार मारण्याची सुवर्णसंधी आहे.

कांगारूंचा युवा संघ सहाव्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापैकी त्यांचा दोनदा भारताशी सामना झाला आणि दोन्ही वेळा कांगारूंना पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय क्रिकेट संघाने नवव्यांदा अंडर-19 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने सर्वाधिक पाचवेळा विजेतेपद पटकावले आहेत.

पाकिस्तानचा उपांत्य सामन्यात पराभव

पहिल्या उपांत्य सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेला नमवून भारताच्या युवा ब्रिगेडने फायनलचे तिकिट मिळवले. दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला गेला, ज्यात कांगारूंनी विजय मिळवून शेजाऱ्यांच्या तोंडचा घास पळवला. गुरुवारी खेळल्या गेलेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीतील सुरुवातीच्या ओलाव्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पाकिस्तानला एकापाठोपाठ एक मोठे धक्के दिले.

खरं तर एकवेळ पाकिस्तानच्या संघाने 79 धावांत पाच गडी गमावले होते. पण अझान अवैस (52) आणि अराफत मिन्हास (52) यांनी सहाव्या बळीसाठी साजेशी भागीदारी नोंदवली. मात्र संघाच्या 133 धावांवर अजान अवैस बाद होताच उर्वरित फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले. त्यामुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ 179 धावांत गारद झाला.

U19 World Cup 2024 अंतिम टप्प्यात

छोट्या आव्हानाचा बचाव करताना पाकिस्तानी गोलंदाजांनी त्यांच्या फलंदाजांपेक्षा चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली. एकवेळ ऑस्ट्रेलियाने 59 धावांत चार गडी गमावले होते. पण, ऑलिव्हर पीकसह ऑस्ट्रेलियन सलामीवीर हॅरी डिक्सनने डाव सांभाळला. या दोघांनी आपल्या संघाला 59 वरून 102 धावांवर नेले. डिक्सन अर्धशतक (50) झळकावून बाद झाला. यानंतर ऑलिव्हर पीकने टॉम कॅम्पबेलसह (25) धावा करत संघाला 146 धावांपर्यंत पोहोचवले.

ऑस्ट्रेलियन संघ विजयापासून अवघ्या 34 धावा दूर होता. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक झटपट 4 बळी घेत सामन्यात रंगत आणली. काही वेळातच धावसंख्या 9 बाद 164 धावा अशी झाली. मात्र, या उत्कृष्ट कामगिरीनंतरही गोलंदाजांना पाकिस्तानच्या छोट्या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या राफेल मॅकमिलन (19) आणि कॅलम विडेलर (2) यांनी 10व्या बळीसाठी 17 धावांची नाबाद भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया फायनल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना रविवारी होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भिडणार आहेत. यापूर्वीच्या दोन्ही लढतीत भारताने विजय मिळवला होता. भारतीय संघाने 2012 आणि 2018 च्या अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. म्हणजेच 19 वर्षांखालील भारतीय संघाचा अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजयाचा विक्रम 100 टक्के आहे. सध्याच्या अंडर-19 विश्वचषकातही भारताने आपले सर्व सामने जिंकले आहेत.

News Title- U19 World Cup 2024 2nd semi-final Australia beat Pakistan, so ind vs aus final will be held

महत्त्वाच्या बातम्या –

सर्वात मोठी बातमी; ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, मुंबई हादरली

शेतकरी पेन्शन योजनेची घोषणा, शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3 हजार रुपये!

कॉमेडियन कपिल शर्मा मोठ्या अडचणीत; थेट ईडीकडे केली तक्रार

महाराष्ट्रातील हवामानात बदल, ‘या’ भागात पावसाची शक्यता!

प्रसिद्ध अभिनेत्री Yami Gautam ने चाहत्यांना दिली मोठी गुड न्यूज!