Football | SAFF अंडर-19 फुटबॉल स्पर्धेत काही नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या SAFF अंडर-19 महिला फुटबॉल स्पर्धेत मोठा गदारोळ झाला. परिस्थिती अशी होती की सुरुवातीला भारतीय संघ विजेता घोषित झाला, पण नंतर संयुक्त विजेता घोषित करावे लागले. बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या या सामन्यात बांगलादेशच्या समर्थकांनी या निर्णयाविरोधात दगड आणि बाटल्या फेकण्यास सुरुवात केली, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
आपल्या घरच्या संघाचा पराभव होत असल्याचे दिसताच बांगलादेशच्या समर्थकांनी गोंंधळ घातला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली असताना भारताचे विजेतेपद काढून घेण्यात आले. कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीत असे दृश्य पाहायला मिळेल, अशी कोणालाच कल्पना नसते. त्यामुळे या सामन्याने क्रीडा विश्वाचे लक्ष वेधले. बांगलादेशच्या समर्थकांनी मैदानावरच दगडफेक सुरू केली आणि गोंधळ इतका वाढला की सामन्याचा निकाल बदलावा लागला.
फायनलमध्ये गोंधळ
दरम्यान, ढाका येथे भारत आणि बांगलादेश अंडर-19 महिला संघ यांच्यातील फुटबॉल फायनल 11-11 अशी बरोबरीत राहिली. सामना संपल्यानंतर पंचांनी नाणेफेक करून सामन्याचा निकाल ठरवला. खरं तर नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला अन् टीम इंडियाने चॅम्पियनशिप जिंकली, पण बांगलादेशच्या चाहत्यांना ही बाब खटकली. सामना बरोबरीत संपल्यानंतर नाणेफेकीच्या आधारे विजेता ठरवल्याने एकच गोंधळ झाला.
बांगलादेश संघ पेनल्टी वाढवण्याची मागणी करत होता, पण रेफ्रींनी तसे केले नाही. त्यामुळे चाहते अनियंत्रित झाले आणि त्यांनी मैदानावर दगड आणि बाटल्या फेकण्यास सुरुवात केली आणि एकच गोंधळ उडाला. या गदारोळात भारतीय संघ आपला विजय साजरा करत होता. भारतीय शिलेदार मैदानात आपल्या विजयाचा आनंद साजरा करत होते.
Breaking News (🚨) – India 🇮🇳 and Bangladesh have been announced as the Joint Champions of 2024 #SAFF U–19 Women’s Championship which has been held in Dhaka, Bangladesh! 🫂
Although team #India 🇮🇳 will be handed over the champions trophy & will bring it home! 🏆 pic.twitter.com/AkeDBzPVBs
— IFTWC – Indian Football (@IFTWC) February 8, 2024
Football ची चॅम्पियन्स ट्रॉफी भारताकडे
मोठ्या वादानंतर फेडरेशनला आपला निर्णय बदलावा लागला आणि शेवटी भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. भारतीय संघ मैदान सोडण्याचा प्रयत्न करत असताना बांगलादेशचा संघ मैदानात थांबून निर्णयाचा निषेध करत होता, त्यामुळे समर्थकही मैदानात त्यांच्यासोबत आले आणि गोंधळ घालत राहिले.
बांगलादेशच्या खेळाडूंनी दाखवलेला रूद्रावतार समर्थकांना भडकावण्यात काहीसा कारणीभूत ठरला. विशेष बाब म्हणजे भारत आणि बांगलादेश संयुक्तपणे विजेते घोषित झाले असले तरी देखील चॅम्पियन्स ट्रॉफी भारतालाच दिली जाईल.
News Title- final match between India and Bangladesh in the SAFF U-19 Football Championship was a big controversy
महत्त्वाच्या बातम्या –
मी घरात देखील शॉर्ट्स घालू शकत नव्हते; घटस्फोट अन् ईशा देओलचे ‘ते’ विधान चर्चेत
हल्द्वानी दंगल! मशिदीवर कारवाई अन् हिंसाचाराचा आगडोंब; राज्यात हाय अलर्ट, शहर राहणार बंद
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल; टीम इंडियाला सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावण्याची सुवर्णसंधी
सर्वात मोठी बातमी; ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, मुंबई हादरली