“महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखायची असेल तर 48 तासांसाठी…”

Raj Thackeray | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar murder case) यांची मॉरिस नरोना याने फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता मनसेकडून राज ठाकरे (Raj Thackeray ) यांचा एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.

राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर राज ठाकरे यांनी या व्हिडीओतून भाष्य केलं आहे. हा व्हिडीओ तसा जुना आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहून मनसेच्या अधिकृत ट्विटरवर तो पोस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे राजकारणात सध्या या व्हिडीओचीच चर्चा होत आहे.

मनसेचं ट्वीट चर्चेत

मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ मनसेने ट्वीट केला आहे. मुंबई पोलिसांना 48 तासांची मोकळीक द्या, असं विधान यात राज ठाकरे करताना दिसून येत आहेत. हाच व्हिडीओ पुन्हा एकदा ट्वीट करण्यात आला आहे. राज ठाकरे आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रचलित आहेत. त्यांचा या संदर्भातील व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

‘… तर महाराष्ट्रातून गुन्हेगारी नाहीशी होईल’

आपल्या देशात कायदे आहे, म्हणजे लॉं (law) आहे. मला असं वाटतं ऑर्डरची गरज आहे. आणि त्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात. माझा मुंबई पोलिसांवर 100 % विश्वास आहे. मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिसांच्या हातात 48 तास द्या, आणि त्यांना सांगा मला महाराष्ट्र साफ करून द्या. सगळ्या, सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असतात, पण ऑर्डर्स नसतात. अशा वेळेस रिस्क कोण घेईल?, असं त्यांनी म्हटलंय.

पोलिसांनी एखादी भूमिका घेतल्यानंतर त्यांना जर जेलमध्ये जाव लागत असेल, तर का जातील ते जेलमध्ये?, कोणासाठी जातील? तिथे बसलेलाच माणूस टेम्पररी असेल तर त्याच्यासाठी यांनी कायमचं जेलमध्ये जायचं, याला काही अर्थ आहे का?, असा सवाल या व्हिडीओमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील बेछूट गोळीबार, टोळीयुद्ध, गुन्हेगारांचा मुक्त संचार, कोयता गॅंगचा उच्छाद, मुलींचं अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

News Title- Raj Thackeray old video goes viral

महत्त्वाच्या बातम्या- 

ठाकरे गटाला मोठा धक्का!, ‘हा’ आमदार शिंदे गटात जाणार?

साड्यांचे वाटप, लाईट्स गेले मग घोसाळकरांची हत्या; नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरार

“घोसाळकरांच्या हत्येची घटना धक्कादायक, पूर्वी अशा बातम्या फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशमधून यायच्या”

बांगलादेशमध्ये टीम इंडियावर दगडफेक! फायनलमध्ये गोंधळ, भारताचे विजेतेपद काढून घेतले

मी घरात देखील शॉर्ट्स घालू शकत नव्हते; घटस्फोट अन् ईशा देओलचे ‘ते’ विधान चर्चेत