खुशखबर! सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Rate | फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना असतो. या काळात जगभरात व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जातो. बरेच व्यक्ती या काळात आपल्या प्रेमासाठी गिफ्ट खरेदी करत असतात. त्यात सोने-चांदीचे दागिनेही (Gold-Silver Rate ) भेट म्हणून दिले जातात. आता तुम्हाला या आठवड्यात सोने खरेदी करायचे असेल, हा काळ फायद्याचा ठरेल. या आठवड्यात सोने-चांदीत घसरणीचे सत्र सुरू असल्याने तुम्ही मोठी खरेदी करू शकता.

जागतिक बाजारातील घाडमोडींमुळे सध्या सोने-चांदी स्वस्त झाले आहे. आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल न केल्याने बाजारात समीकरणे बदलली आहेत. याचा परिणाम सराफा बाजारावरही झाला आहे. त्यामुळे आज सोने-चांदीचे भाव काहीसे उतरले आहेत.

‘असे’ असतील आजचे दर

जानेवारी महिन्यात सोन्याच्या (Gold-Silver Rate) भावात मोठी घसरण झाली होती. सोने तब्बल 2200 रुपयांनी तर चांदीत 4400 रुपयांची घसरण झाली होती. तर या महिन्याच्या सुरुवातीला त्यात पुन्हा वाढ झाली. 1 फेब्रुवारी रोजी सोने 170 रुपयांनी तर 2 फेब्रुवारीला 160 रुपयांनी भाव वधारले. तर 3 फेब्रुवारी रोजी किंमतीत 220 रुपयांची घसरण झाली. मात्र या तीन चार दिवसात याचे भाव पुन्हा उतरले आहेत.

6 फेब्रुवारी रोजी 220 रुपयांनी सोने उतरले होते. तर, 7 फेब्रुवारी रोजी 180 रुपयांनी किंमती वधारल्या. आता कालच 8 फेब्रुवारी रोजी किंमतीत किंचित घसरण झाली आहे. त्यानुसार 22 कॅरेट सोने 58,140 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,320 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर, एक किलो चांदीचा भाव 73,500 रुपये झाला आहे.

जाणून घ्या कॅरेटचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) नुसार सोने-चांदीचे (Gold-Silver Rate Today) आजचे भाव ठरवले आहेत. त्यानुसार 24 कॅरेट सोने 62,612 रुपये, 23 कॅरेट 62,361 रुपये, 22 कॅरेट सोने 57,353 रुपये झाले. 18 कॅरेट 46,959 रुपये, 14 कॅरेट सोने 36,628 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहेत.

तसेच एक किलो चांदीचा भाव 69,950 रुपये झाला आहे. त्यामुळे तुम्ही या व्हॅलेंटाईन वीकमध्ये आपल्या आवडीचे दागिने खरेदी करुन आपल्या प्रिय व्यक्तीला खुश करू शकता. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर, तुम्ही घरबसल्याही ती जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व माहिती प्राप्त होईल.

News Title- Gold-Silver Rate Today

महत्त्वाच्या बातम्या –

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर सरकारने घेतला महत्वाचा निर्णय!

‘या’ राशीच्या सर्व मनोकामना आज पूर्ण होतील!

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, ‘या’ विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत बदल

ठाकरे गटाला मोठा धक्का!, ‘हा’ आमदार शिंदे गटात जाणार?