शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, ‘या’ विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत बदल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

School Time |  मागील वर्षी 2023 मध्ये राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी एक मोठा निर्णय घेतला होता. त्या निर्णयावर राज्यशासनानं अंमलबजावणी केली आहे. राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत बदल (School Time) करण्यात आला असल्याची माहिती आता समोर आली आहे. सकाळी 9 नंतर शाळा भरवण्यात येणार आहे.

राज्य शासनाने आध्यादेश काढला आहे त्यामध्ये पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंत विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेमध्ये बदल करण्यात येण्याबाबतची माहिती नमूद करण्यात आली आहे. सर्व शाळांना शासन निर्णयानुसार आपल्या शाळा भरवण्याचं नियोजन करावं लागणार आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे बदलली शाळेची वेळ

अलिकडे बदलत्या काळात जीवनशैलीही बदलू लागली आहे. मुलांमध्ये रात्री उशिरा जागण्याचा कल वाढत असल्यानं मुलांना सकाळी झोपेतून उठायला त्रास होतो. त्यांची सकाळी लवकर झोप होत नाही. यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. यामुळे राज्य सरकारने चौथीपर्यंत मुलांच्या शाळेची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा शाळा भरवण्याचा निर्णय राज्यशासनानं घेतला आहे. असं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला.

संशोधनातून समोर आलेल्या माहितीचा अभ्यास केल्यास लक्षात येतं की, राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांपैकी काही शाळा विशेषत: खाजगी शाळा भरवण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी 7 नंतर असल्याचे दिसून येते.

राज्यपालांचा आदेश

राज्यपालांनी मागील वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानाच्या निमित्तानं त्यांनी या विषयावर वक्तव्य केलं होतं. रात्री उशिरा झोपण्याच्या संस्कृतीमागे सकाळी शाळेची वेळ असणे विद्यार्थ्याच्या जीवनशैलीसाठी हानिकारक आहे, असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

News Title – School Time Will change in maharashtra

महत्त्वाच्या बातम्या