Astrology | आजचा दिवस काही राशीसाठी (Astrology) अत्यंत शुभ मानला गेला आहे. कारण, आज (9 फेब्रुवारी) सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला आहे. भगवान शिव आणि विष्णु यांची मौनी अमावस्येला पूजा केली जाते. ही अमावस्या आजच्या दिवशी आल्याने काही राशीसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे.
सर्वार्थ सिद्धी योगात केलेले कार्य खूप शुभ मानले जाते. या काळात केलेले काम यशस्वीदेखील होते. मौनी अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योगाची निर्मिती 4 राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरते. हा योग या चार राशीसाठी भाग्याचा ठरतो. आता या राशी नेमक्या कोणत्या आणि त्यांना काय लाभ होऊ शकतो, ते पाहूया.
‘या’ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा
तूळ : तूळ राशीच्या (Astrology) लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. आज मौनी अमावस्या असल्याने सर्वार्थ सिद्धी योग सकारात्मक परिणाम देईल. या लोकांचे काम आज यशस्वी होईल. यांचे कौतुकही केले जाईल. आजच्या दिवशी तुम्ही नवीन कार्याला सुरुवात केली तर भरभराटी येईल. उत्पन्नही वाढेल.
सिंह : या राशीसाठीदेखील आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. आर्थिक लाभ होईल. मानसिक तणावातून आराम मिळेल. शांतीचा अनुभव येईल.
कुंभ : कुंभ राशीच्या (Astrology) लोकांसाठी आज मौनी अमावस्येचा दिवस लाभदायक ठरणार आहे. या लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य प्राप्त होईल. सर्वांच्या सहकार्याने तुम्ही तुमचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.
मकर : मकर राशीच्या लोकांची नोकरीच्या ठिकाणी स्थिती सुधारेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. तुम्हाला आज धनलाभ होण्याची दाट संभावना आहे.
News Title : Astrology Sarvarth Siddhi Yoga will come together
महत्त्वाच्या बातम्या-
“घोसाळकरांच्या हत्येची घटना धक्कादायक, पूर्वी अशा बातम्या फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशमधून यायच्या”
बांगलादेशमध्ये टीम इंडियावर दगडफेक! फायनलमध्ये गोंधळ, भारताचे विजेतेपद काढून घेतले
मी घरात देखील शॉर्ट्स घालू शकत नव्हते; घटस्फोट अन् ईशा देओलचे ‘ते’ विधान चर्चेत