Beed Crime | बाप आणि लेकीच्या नात्याला काळिमा फसणारी घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यात (Beed Crime) ही धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. बापानेच पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या नराधम बापाने एकदा नाही तर वारंवार लेकीवर बलात्कार केला.
या प्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला आहे. सदरील मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. 40 वर्षीय या नराधम दारुड्या बापाने आपल्याच लेकीवर हा अन्याय केला आहे. पोलिसांना या नराधम बापाला अटक केली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
पीडित तरुणी 7 महिन्यांची गर्भवती
बीडच्या (Beed Crime) धारूर तालुक्यातील एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा नराधाम बाप ऊसतोड मजूर असून 40 वर्षीय आहे. त्याला दारूची प्रचंड सवय आहे. याच दारूच्या नशेत त्याने आपल्याच पोटच्या मुलीवर अत्याचार केला. ही मुलगी अवघी 14 वर्षांची आहे. याबाबत तिच्या आईला कसलाच थांगपत्ता नव्हता. एवढे महीने या मुलीवर तिचाच बाप अत्याचार करत असताना ही माई मात्र आपल्या कामात व्यस्त होती.
एक दिवस अचानक या मुलीचे पोट दुखायला लागले. यानंतर तिला अंबाजोगाईच्या एका रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. या ठिकाणी सर्व तपासण्या केल्यानंतर सत्य समोर आले. हे सत्य ऐकून तिच्या आईला धक्काच बसला. ही पीडित तरुणी तेव्हा 7 महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं.
नराधम बापाविरोधात तक्रार दाखल
ही घटना ऐकून पीडितेच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या मुलीला नंतर या माऊलीने विश्वासात घेऊन सर्व हकीकत विचारली. तेव्हा या 14 वर्षीय मुलीने आपल्याच वडिलांनी हे कृत्य केल्याचं सांगितलं. सर्व घटना ऐकल्यानंतर पीडितेच्या आईने आपल्या पतीविरोधात (Beed Crime) तक्रार दाखल केली.
पीडितेच्या फिर्यादीवरून या नराधम बापाविरोधात धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर सर्वत्रच संताप व्यक्त केला जात आहे. आई आणि वडिलांच्या या अत्यंत पवित्र नात्याला या घटनेमुळे काळिमा फासलं गेलं आहे.
News Title- Beed Crime 14-year-old girl raped by her father
महत्वाच्या बातम्या-
राज्यातील शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी समोर!
‘एक दिवस जायचा टपकून वर, त्याचं वय झालंय’; जरांगेंनी भुजबळांना सुनावलं
खुशखबर! सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
“महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखायची असेल तर 48 तासांसाठी…”