राज्यातील शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Teacher and Non Teacher Recruitment | राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर सुटला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंदी असलेल्या भरतीला आता परवानगी मिळाली आहे. या निर्णयाने शिक्षकांना (Teacher and Non Teacher Recruitment) मोठा आनंद झाला आहे.

शिक्षकेतर कर्मचारी भरतीवर दिलेली स्थगिती मुंबई हायकोर्टाने उठवली असल्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे. यामुळे राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी भरती होणार आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये (Teacher and Non Teacher Recruitment) 15 हजारांपेक्षा अधिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. 28 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयास असलेली बंदी न्यायालयाने पूर्णतः उठविली असल्याने आता यासाठी भरती केली जणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून नव्याने सरळ सेवा भरती केली जाणार आहे. तसेच पदोन्नतीचा मार्गही मोकळा झाला आहे.

सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये 21,678 शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार असून संभाजीनगर जिल्ह्यात 571 जागा भरल्या जाणार आहेत. डीएड आणि पात्रताधारक उमेदवारांसाठी ही मोठी संधी असणार आहे. 12 फेब्रुवारीपर्यंत यासाठी प्रवेश घेता येणार आहेत. मात्र काही तांत्रिक अडचणी येत असल्याने यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

‘इतकी’ पदे भरली जाणार

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील (Teacher and Non Teacher Recruitment) एकूण 23 हजार 533 लिपिकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. तर 2 हजार 118 ग्रंथपालाची पदे मंजूर आहेत. 6 हजार 732 प्रयोगशाळा सहायकांची पदे अशी एकूण 32 हजार 383 पदे मंजूर आहेत. यातील लिपिकाची 11 हजार 700 च्या आसपास पदे रिक्त आहेत. ग्रंथपालाची 1 हजारच्या आसपास पदे रिक्त आहेत.

त्यामुळे प्रयोगशाळा सहायकाच्या एकूण 6 हजार 732 पदांपैकी 3 हजार 300 आणि लिपिकाची 11 हजार 700 अशी एकूण 15 हजार पदांची भरती केली जाऊ शकते. या भरतीसाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं. आता ही बंदी उठल्यामुळे शिक्षकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

News Title-  Teacher and Non Teacher Recruitment in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या –

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर सरकारने घेतला महत्वाचा निर्णय!

‘या’ राशीच्या सर्व मनोकामना आज पूर्ण होतील!

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, ‘या’ विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत बदल

ठाकरे गटाला मोठा धक्का!, ‘हा’ आमदार शिंदे गटात जाणार?