पुणेकरांनो घराबाहेर पडणार असाल तर ‘ही’ बातमी वाचा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पुणेकरांसाठी (Pune News) अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. बंडगार्डन आणि कोरेगाव पार्क (Pune Traffic) भागातील वाहतूक ही प्रायोगिक तत्त्वावर बदलण्यात आली आहे. या मार्गावर नक्की काय बदल झालाय पाहुयात.

पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल 

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, मोर ओढा चौक ते ब्लू डायमंड हॉटेल चौक यादरम्यान साधू वासवाणी पुलावरून हलक्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे.

Pune News | ‘या’ मार्गांचा करा वापर

आय बी चौक ते सर्किट हाऊस चौक दरम्यान जनरल अरुण कुमार वैद्य मार्गावर एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.
मोर ओढा चौकातून आयबी चौकाकडे जाण्यासाठी मोर ओढा चौक सरळ सदन कमांड समोरून कौन्सिल हॉल चौकातून उजवीकडे वळण घेऊन जावं लागणार आहे.

पीएमटी आणि अन्य खासगी बस ना मोर ओढा चौकातून सरळ रस्त्यावरून डावीकडे वळावे लागणार आहे.
तारोपोर रोड जंक्शन येथून उजवीकडे वळून चौकात येता येणार असून येथून मंगलदास चौकात जाता येणार आहे.
ब्लू डायमंड चौकातून साधू वासवानी पुलावर वाहनांना प्रवेश नसल्याने ब्लू डायमंड चौक ते मोबोज चौक एकेरी मार्ग करण्यात आला आहे.

मोबोज चौकातून डावीकडे वळण घेऊन मंगलदास चौक आयबी चौक सर्किट हाऊस इथं जाता येणार आहे. ब्लू डायमंड चौक ते मोबोज चौक एकेरी वाहतूक असल्याने मोबोज चौकातून मंगलदास रस्त्या मार्गे हॉटेल ब्लू डायमंड चौकाकडे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यासाठी मोबोज चौकातून बंडगार्डन रस्त्याने श्रीमान हॉटेल चौक उजवीकडे वळून कोरेगाव पार्क जंक्शन इथे जाता येणार आहे. आयबी जंक्शन ते सर्किट हाऊस चौक हा एकेरी मार्ग आवश्यकतेप्रमाणे दुहेरी करण्यात येणार आहे.

पुणे शहरातील कोरेगाव पार्क भागातून कॅम्प परिसराला जोडणारा साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल कमकुवत झाला आहे. लवकरच हा पूल पाडण्यात येणार असून त्या भागात नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीमध्ये तात्पुरता बदल करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यातील शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी समोर!

‘एक दिवस जायचा टपकून वर, त्याचं वय झालंय’; जरांगेंनी भुजबळांना सुनावलं

खुशखबर! सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

“महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखायची असेल तर 48 तासांसाठी…”

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!