तुमच्या प्रिय व्यक्तीला चॉकलेटसोबतच द्या ‘या’ गोड शुभेच्छा; नात्यात वाढेल गोडवा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chocolate Day 2024 Wishes | संपूर्ण जगभरात व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जात आहे. फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात प्रेमासाठी (Chocolate Day 2024 Wishes) खास गोष्टी केल्या जातात. सात दिवस याला साजरे केले जाते. आज (9 फेब्रुवारी) चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी आपल्या जोडीदाराला चॉकलेट देऊन खुश करण्याचा प्रयत्न करतात. आजकाल अत्यंत महागडी चॉकलेट बाजारात आली आहेत. मात्र, फक्त चॉकलेट न देता तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला शब्दातून आपल्या व्यक्त करू शकता. कारण, प्रेमाचे शब्द हे कायम स्मरणात असतात. असेच गोड शब्द पाठवून तुम्ही तुमच्या नात्यात अजून गोडवा निर्माण करू शकता.

Chocolate Day 2024 Wishes

या जगात मला भेटलेली तू एक खूप गोड व्यक्ती आहेस,
म्हणूनच तुझ्यासाठी खास चॉकलेटचा हा बॉक्स..

किटकॅटचा स्वाद आहेस तू,
डेअरी मिल्कसारखी स्वीट आहेस तू,
कॅडबरीपेक्षाही खास आहेस तू,
काहीही असो माझी फाईव्ह स्टार आहेस तू..
Happy Chocolate Day..!

मी डेअरी आणि तू आहेस मिल्क,
मी आहे किट तर तू आहेस कॅट,
मी आहे फाईव्ह तर तू आहेस स्टार,
थोडक्यात मी आहे स्वीट तू आहेस माझी स्वीटहार्ट..
Happy Chocolate Day..!

जेव्हा मी माझं आवडतं चॉकलेट पाहतो
तेव्हा मला फक्त तुझी आठवण येते,
कारण ते तुझ्यासारखं आहे,
वरवर कडू आणि आतून खूप गोड..

चॉकलेटच्या गोडव्यासारखं तुझं माझं नातं असंच कायम राहूदे
माझ्या जीवन संगिनीला गोड-गोड शुभेच्छा
Happy Chocolate Day..!

News Title : Chocolate Day 2024 Wishes

महत्त्वाच्या बातम्या-

“महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखायची असेल तर 48 तासांसाठी…”

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर सरकारने घेतला महत्वाचा निर्णय!

‘या’ राशीच्या सर्व मनोकामना आज पूर्ण होतील!

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, ‘या’ विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत बदल