आधी जवळीकता वाढवली नंतर…; अभिषेक घोसाळकरांना मारण्याचं आधीच झालेलं प्लॅनिंग

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Abhishek Ghosalkar | राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. राज्यात अनेक महिन्यांपासून गुन्हेगारी सत्र सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. काही दिवसांआधी गणपत गायकवाड प्रकरणाची चर्चा होती. त्यानंतर आता दहीसर येथे माॅरिस नामक व्यक्तीनं ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यानंतर त्यानं स्वत:वर देखील गोळीबार केला.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक गोळीबार आणि अनेक हत्येच्या घटना घडल्या आहेत. अभिषेक घोसाळकर प्रकरणामध्ये मोठी बातमी आता समोर आली आहे. याप्रकरणाचे पडसाद हे राजकीय पातळीवर होताना दिसत आहे. अनेक नेत्यांची यावर प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

काय घडलं नेमकं? Abhishek Ghosalkar Case

दहिसर येथील आयसी कॉलनीतील मॉरिस भाईच्या कार्यालयात गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. मेहुल पारेख नामक व्यक्तीही उपस्थित होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर चौकशी केली जात आहे. यावर अभिषेक घोसाळकर यांच्या निकटवर्तीयाने प्रतिक्रिया दिली आहे. घडलेला प्रकार सांगणाऱ्याचं नाव लालचंद पाल असं आहे.

गेल्या काही वर्षांआधी माॅरिस आणि अभिषेक घोसाळकर यांच्यामध्ये वाद होता. मात्र हा वाद मिटवण्यासाठी माॅरिसने अभिषेक घोसळकरची बॅनरबाजी केली. त्यांच्यात काही महिन्यांमध्ये जवळीकता वाढली होती. 8 जानेवारी दिवशी अभिषेकला माॅरिसने साड्या वाटपाचा कार्यक्रमासाठी फोन करून बोलावलं आणि त्यानंतर फेसबुक लाईव्ह करण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये नेलं आणि  त्यावेळी माॅरिसने लालचंदला ऑफिसबाहेर काढलं. त्यानंतर गोळीबार करण्यात आला, अशी माहिती लालचंद पाल यांनी दिली आहे.

त्यानंतर पाल हा कार्यालयामध्ये गेल्यानंतर माॅरिसने सलग गोळीबार करणं सुरूच ठेवलं होतं. त्यानंतर अभिषेक खाली पडला तरीही माॅरिस त्याच्यावर गोळीबार करत होता अशी माहिती पालनं सांगितली आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार माॅरिसने देखील स्वत:ला संपवलं होतं. याप्रकरणावर राज्यभरातून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

वर्षा निवासस्थानी बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली. या भेटीमध्ये सध्या सुरू असलेल्या गोळीबार प्रकरणावर निर्णय घेण्यात आला आहे. अनेकांकडे सध्या शस्त्र आहेत. त्या शस्त्राचा वापर करताना त्याचा परवाना असावा परवाना असून त्या शस्त्राचा गैरवापर होत आहे, त्यांना बोलावून त्यांची चौकशी करावी. यामुळे आयत कोलीत मिळतंय. याला उत्तर कसं द्यायचं याची चर्चा झाली आहे.

 News Title – Abhishek Ghosalkar Murder News Update

महत्त्वाच्या बातम्या

खुशखबर! सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

“महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखायची असेल तर 48 तासांसाठी…”

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर सरकारने घेतला महत्वाचा निर्णय!

‘या’ राशीच्या सर्व मनोकामना आज पूर्ण होतील!